WATCH Nicholas Pooran: नवीन उल हक नंतर आता पूरनने विराटला डिवचले? VIDEO होतोय व्हायरल

Virat And Naveen Ul Haq Controversy: निकोलस पूरनने दिलेलं रिऍक्शन सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
nicholas pooran and naveen ul haq
nicholas pooran and naveen ul haq instagram

Virat Kohli: अफगाणिस्थान संघाचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक आयपीएल २०२३ स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. या हंगामात जो प्रचंड चर्चेत राहिला आहे. काही दिवसांपूर्वी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. तेव्हापासून या दोघांमधील वाद हा चर्चेचा विषय ठरतोय. मुंबईविरुद्व झालेल्या सामन्यात जेव्हा विराट कोहली बाद झाला होता, त्यावेळी नवीन उल हकने एक स्टोरी शेअर केली होती.

nicholas pooran and naveen ul haq
IPL 2023 Points Table: RCB साठी 'करो या मरो', पराभुत होताच मुंबई नव्हे तर 'हे' २ संघ थेट करणार Playoff मध्ये प्रवेश

या स्टोरीमध्ये नवीन उल हक आंबे खाताना दिसून आला होता. यावरून असे म्हटले गेले होते की, त्याने स्टोरी शेअर करत विराटला टोमणा मारला आहे. त्याने एकदा नव्हे तर दोनदा सामना पाहताना आंबे खात असतानाचा फोटो शेअर केला होता. आता यावर निकोलस पूरनने दिलेलं रिऍक्शन सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

पुरनने घेतली विराटची फिरकी?

तर झाले असे की , आयपीएल २०२३ स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत निकोलस पूरन आधी समोर येतो. त्यानंतर तो म्हणतो की, 'ओळखा पाहू माझ्यासोबत कोण आहे?' त्यानंतर तो नवीन उल हककडे कॅमेरा फिरवतो.

त्यानंतर विराटला डिवचण्यासाठी निकोलस पुरन नवीन उल हकला पाहून द मँगो गाय.. असे म्हणतो. काही दिवसांपूर्वी मँगोचा फोटो शेअर करत नवीन उल हकने विराटला चिडवण्याचा प्रयत्न केला होता. तो या व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम स्टोरी बद्दल चर्चा करताना दिसून येत आहे. मात्र यावरून असं म्हणता नाही येणार की तो विराटची फिरकी घेतोय. कारण ते दोघेही एकमेकांसोबत चर्चा करताना दिसून येत आहे. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

काय होता विराट- नवीन उल हकचा वाद?

आयपीएल २०२३ स्पर्धेत १ मे रोजी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाची फलंदाजी सुरु असताना विराट कोहली नवीन उल हकला काहीतरी बोलताना दिसून आला होता.

त्यानंतर जेव्हा तो बाद होऊन माघारी परतला, त्यावेळी विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. हा वाद सामना झाल्यानंतर आणखी चिघळला होता.

कारण विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघे आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी संघातील खेळाडूंना मध्यस्ती करण्यासाठी मध्ये यावं लागलं होतं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com