
IPL KKR News : आयपीएलचा नवी सीजन सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 31 मार्चपासून आयपीएल सुरु होणार आहे . कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या जागी संघाची सूत्र नितीश राणाच्या हाती दिली आहेत. नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्सकडून अनेक सीजन खेळला आहे. तसेच त्याची आयपीएल कारकीर्दही मोठी आहे.
नितीश राणाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 91 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 2181 धावा केल्या आहेत, ज्यात 15 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र टीम इंडियासाठी तो केवळ 3 सामने खेळला आहे.
मागील सीजनमध्ये म्हणजेत आयपीएल 2022 मध्ये नितीश राणाने चांगली कामगिरी केली होती. या हंगामात त्याने 14 सामन्यांमध्ये 27.77 च्या सरासरीने 361 धावा केल्या होत्या. त्यात 2 अर्धशतकांचाही समावेश होता.
पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस बाहेर
श्रेयस अय्यरला पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलबाहेर बसावं लागणार आहे. अय्यरवर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुढील काही महिने त्याला मैदानाबाहेर बसावं लागणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.