Asia Cup 2023: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कोण होईल विजेता?

Asia Cup 2023 Final Match Weather Update: या सामन्यासाठी रिजर्व्ह डे नसणार आहे.
Asia Cup 2023 Final Match Weather Update
Asia Cup 2023 Final Match Weather Updatesaam tv

Asia Cup 2023 Final Match Weather Update:

श्रीलंकेत सुरू असलेल्या आशिया चषकात फलंदाजांसह पावसाची देखील तुफान फटकेबाजी सुरू आहे. आतापर्यंत असा एकही सामना नसेल ज्यात पावसाने खोळंबा घातला नसेल. आता अंतिम सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

एशियन क्रिकेट काऊन्सिलने स्पष्ट केलं आहे की, अंतिम सामन्यात कुठलाही रिझर्व्ह डे असणार नाही. त्यामुळे अंतिम सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.

Asia Cup 2023 Final Match Weather Update
AFG VS SL, Asia Cup: गणित चुकलं ना राव! ३७.१ षटकानंतरही अफगाणिस्तानला होता चान्स; काय होतं समीकरण? जाणून घ्या

श्रीलंकेत मॉन्सून असूनही आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पाऊस असल्यामुळे प्रेक्षक मैदानावर येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पीसीबीला आर्थिक फटका बसला आहे. यापूर्वी ही स्पर्धा युएईमध्ये होणार असल्याची चर्चा होती. मात्र अखेर ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेतील अंतिम सामना येत्या १७ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

कुठून सुरू झाला वाद?

आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धा कुठे खेळवायची याबाबत जोरदार चर्चा रंगली. शेवटी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हायब्रीड मॉडेलनुसार या स्पर्धेतील ४ सामने पाकिस्तानात तर ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार असल्याचं ठरलं होतं. या मॉडेलनुसार भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार असल्याचं ठरलं होतं. स्पर्धेतील अंतिम सामना देखील श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. मात्र पावसामुळे व्यत्यय येत असल्याने आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Latest sports updates)

Asia Cup 2023 Final Match Weather Update
Virat Kohli Female Fan Viral Video: शेजाऱ्यांवर प्रेम करणं चुकीचं नाही... तरुणीचं विराट प्रेम पाहून पाकिस्तानी फॅन्सचा तिळपापड

सुपर ४ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. तर भारत- पाकिस्तान सामना येत्या १० सप्टेंबर रोजी रंगणार आहे. जर हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर आशिया चषकात पहिल्यांदाच भारत- पाकिस्तान अंतिम सामना पाहायला मिळू शकतो. हा सामना १७ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com