
Cricket Viral Video: आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये अनेक घटना घडत असतात. काही मजेशीर असतात तर काही गंभीर घटना असतात.
तर लोकल क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील अशा काही घटना पाहायला मिळत असतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. (Latest sports updates)
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांना राग अनावर होत असतो. काही फलंदाज संताप व्यक्त करताना दिसून येत असतात.
असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की,गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तयार असतो.
फलंदाजही शॉट खेळण्यासाठी तयार असतो. मात्र शेवटच्या क्षणी गोलंदाजाचे मन बदलते आणि तो नॉन स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाचा स्टंप उडवतो. स्टंप उडवल्यानंतर गोलंदाज मानकडींगची मागणी करतो आणि अंपायर त्याला बाद घोषित करतात.
अंपायरने बाद घोषित करताच फलंदाजाचा राग अनावर होतो. तो मैदानाच्या बाहेर जात असताना बॅट तोडताना दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर तो मैदानाच्या बाहेर जाऊन खुर्ची देखील तोडताना दिसून येत आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.