Australian Open 2022: जोकोविच भावुक; आता खेळावर, स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू या!

ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोविचचा व्हिसा मेलबर्न कोर्टाने नाकारला होता. त्याचा पासपोर्ट आणि सरकारने जप्त केलेल्या इतर वस्तू तत्काळ परत कराव्यात असे आदेश न्यायालयाने दिले होते. यानंतर त्याने सरावही सुरू केला हाेता.
Novak Djokovic is set to be deported from Australia after losing a court appeal against the cancellation of his visa.
Novak Djokovic is set to be deported from Australia after losing a court appeal against the cancellation of his visa.saam tv

मेलबर्न : नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) व्हिसा रद्द झाल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयात अपील दाखल केले हाेते. त्या अपील अर्जावर आज (रविवार) सुनावणी झाली. या खटल्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तिन्ही न्यायाधीश जाेकाेविचचा व्हीसा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. यामुळे जाेकाेविचला आता ऑस्ट्रेलियातून बाहेर जावे लागणार आहे. परिणामी उद्यापासून (साेमवार) सुरु हाेत असलेल्या ऑस्ट्रेलिया आेपन (Australian Open 2022) स्पर्धेस त्यास मुकावे लागणार आहे. (Novak Djokovic is set to be deported from Australia after losing a court appeal against the cancellation of his visa)

Novak Djokovic is set to be deported from Australia after losing a court appeal against the cancellation of his visa.
India Open 2022: अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या कन्येने साईना नेहवालला हरवलं

ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोविचला (Novak Djokovic) सार्वजनिक धोका असल्याचे सांगितले आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत येण्यापूर्वी जोकोविचला कोरोनाची (coronavirus) लागण झाली होती, असे असतानाही त्याने गेल्या महिन्यात आपल्या देशात सर्बियातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. जोकोविचने स्वत: काेविड १९ रुग्ण असल्याची कबुली दिली. ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यासाठी त्याच्या इमिग्रेशन फॉर्ममध्येही चुका आढळल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियात (australia) पोहोचताच त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला हाेता. पहिल्यांदा व्हीसा रद्द झाल्यानंतर त्याने न्यायालयात त्यावर हरकत नाेंदवित विजय मिळविला हाेता. त्यानंतर इमिग्रेशन मंत्र्यांनी खूद्द त्यांच्या अधिकाराचा वापर करुन जाेकाेविचचा व्हीसा शुक्रवारी दुस-यांदा रद्द केला. त्यावर जाेकाेविचने अपील केले हाेते. हे अपील न्यायालयाने फेटाळलं.

जोकोविच म्हणताे खेळावर आणि स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू

सरकारच्या निर्णयावर जोकोविच निराश झाला आहे. मी सध्या विश्रांती घेणार आहे. गेले काही आठवडे सर्वांचे लक्ष माझ्यावर केंद्रित आहे आणि मला आशा आहे की आता आपण सर्वजण मला आवडणाऱ्या खेळावर आणि स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू शकू.

जोकोविचचा पहिला सामना सोमवारी होणार होता

२० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नोव्हाकचा सामना बिगरमानांकित त्याच्या देशातील मिओमिर केकमानोविकशी होणार होता. वेळापत्रकानुसार हा सामना उद्या सोमवारी होणार होता. यावेळी जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जेतेपदासाठी कोर्टवर उतरणार होता, पण आता ते शक्य नाही. नोव्हाक जोकोविचने २०२१ च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा ७–५, ६–२, ६–२ असा पराभव केला हाेता.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com