Rohit Sharma: 'या' फलंदाजानं मोडला रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; टी-२० मधील मोठी घडामोड

न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल याने भारताचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा याचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विश्वविक्रम मोडीत काढला.
Rohit Sharma
Rohit SharmaSaam Tv

मुंबई: न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल याने भारताचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विश्वविक्रम मोडीत काढला. मार्टिन गप्टिलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ घडवून रोहित शर्मासारख्या विस्फोटक फलंदाजालाही मागे टाकले आहे.

मार्टिन गप्टिल याने स्कॉटलंडच्या विरुद्ध टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे टाकले आहे. तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ३५ वर्षीय गप्टिलने ३१ चेंडूंवर ४० धावा केल्या आणि त्याचवेळी त्याने रोहित शर्माला मागे टाकले.

Rohit Sharma
Team India: रवींद्र जडेजा T20 मालिकेतही राहू शकतो बाहेर! फिटनेसमुळे वाढले टीम इंडियाचे टेन्शन

गप्टिलचा सलामीचा जोडीदार फिन एलननेही आपलं पहिलं टी-२० शतक केलं. त्याने ५६ चेंडूंत १०१ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पाच विकेट गमावून २२५ धावा केल्या. हे भलेमोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला स्कॉटलंड संघाला ८ विकेट गमावून १५७ धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून ईश सोढीने २८ धावांच्या बदल्यात ४ विकेट आणि मायकल सेंटनरने २३ धावा देत २ विकेट घेतल्या.

Rohit Sharma
IND vs WI : तिसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचं सावट; जडेजानं सांगितला Weather Report

आपल्या डावात गप्टिलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३३९९ धावा केल्या. तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) ३३८९ धावा आहेत. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या ३३०८ धावा, आयर्लंडचा वनडे संघाचा कर्णधार पाल स्टर्लिंगने २८९४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याने २८५५ धावा केल्या आहेत. कोहली २०२१ पर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com