NZ vs IND, 3rd T20 Weather: भारत-न्यूझीलंड तिसरा टी २० सामन्यात पावसाचा 'खेळ'?; हवामानाचा अंदाज काय?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी २० सामन्यावेळी पावसानं हजेरी लावल्यास काय होणार?
 NZ vs IND, 3rd T20/File Photo
NZ vs IND, 3rd T20/File Photosaam tv

NZ vs IND, 3rd T20 Weather Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी २० सामना पावसामुळं रद्द करावा लागला होता. आता तिसऱ्या टी २० सामन्यावरही पावसाचं सावट आहे. हवामानाचा अंदाज बघता तिसऱ्या सामन्यातही पावसाचाच खेळ होऊ शकतो. नेपियरमध्ये हा सामना होत आहे. मात्र, पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी वेलिंग्टनमधील पहिला टी २० सामना पावसामुळं रद्द करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला होता.

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. टी २० आणि वनडे मालिका होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी २० मालिकेने झाली आहे. या मालिकेतील दोन सामने झाले आहेत. पहिला सामना रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला. तिसरा सामना आज, मंगळवारी होणार आहे. सध्या भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. जर आजचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर भारत मालिका जिंकू शकतो. (Cricket News)

 NZ vs IND, 3rd T20/File Photo
धोनीनं घोडचूक केलीय का? CSKने सोडलेला फलंदाज पाडतोय धावांचा पाऊस, कोण आहे हा महारथी?

पावसाचा अंदाज

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी २० सामना व्हावा अशी प्रत्येक क्रिकेट चाहत्याची इच्छा असेल. पण नेपियरमधील हवामान उत्तम असायला हवा. वेदर डॉट कॉमच्या माहितीनुसार, नेपियरमध्ये २२ नोव्हेंबरला दुपारी पावसाचा अंदाज आहे. पावसाची शक्यता ५९ टक्के आहे. संध्याकाळच्या सुमारास ही शक्यता आणखी वाढणार आहे. कारण पावसाची शक्यता ६४ टक्के व्यक्त करण्यात आली आहे. जसजशी संध्याकाळी होईल तशी पावसाची शक्यता कमी होईल. पण वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज आहे.  (Sports News)

 NZ vs IND, 3rd T20/File Photo
Ind vs NZ 3rd T20 : रिषभ पंतचा पत्ता कट? ओपनिंग स्पेशालिस्ट 'धाकड' फलंदाजाला मिळणार संधी

पावसाचं सावट कायम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी २० सामन्यावर पावसाचं सावट कायम राहील. पावसामुळं सामना उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच षटके खेळायला हवीत. सध्याचा हवामानाचा अंदाज बघता मिनी मॅच होण्याची दाट शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com