BCCI- बीसीसीआयचं ठरलयं! 20 खेळाडू अन् वर्ल्डकप आपला, १० वर्षांचा वनवास संपणार; महत्वपूर्ण बैठकीत घेतले मोठे निर्णय

यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीसीसीआयने महत्वपूर्ण बैठक घेच महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
 BCCI- बीसीसीआयचं ठरलयं! 20 खेळाडू अन् वर्ल्डकप आपला, १० वर्षांचा वनवास संपणार; महत्वपूर्ण बैठकीत घेतले मोठे निर्णय

ODI WC 2023: गतवर्षी ऑस्ट्रलियामध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने कंबर कसली आहे. त्यामुळेच यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीसीसीआयने महत्वपूर्ण बैठक घेच महत्वाचे निर्णय घेतले आहेत. (Indian Cricket Team)

 BCCI- बीसीसीआयचं ठरलयं! 20 खेळाडू अन् वर्ल्डकप आपला, १० वर्षांचा वनवास संपणार; महत्वपूर्ण बैठकीत घेतले मोठे निर्णय
Maharashtra Politics: राजकारणातील मुलूखमैदानी तोफ थंडावली, शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

याबाबत अधिक माहिती अशी की, यंदा होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची बीसीसीआयने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. दहा वर्षापासून हुलकावणी देत असलेले विश्वचषक विजेतेपदाचे स्वप्न यंदा पुर्ण होण्याचा इरादाच बीसीसीआयने केला आहे. त्यासाठी १ जानेवारीला महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यामध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रिय क्रिकेट अकॅडमीचा प्रमुख व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि निवडसमिती प्रमुख चेतन शर्मा यांची या बैठकीला उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये टीम इंडियाची टी ट्वेंटी विश्वचषकातील खराब कामगिरी, तसेच आगामी विश्वचषकासाठीची रणनिती यावर चर्चा करण्यात आली. (BCCI)

 BCCI- बीसीसीआयचं ठरलयं! 20 खेळाडू अन् वर्ल्डकप आपला, १० वर्षांचा वनवास संपणार; महत्वपूर्ण बैठकीत घेतले मोठे निर्णय
Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांना पुन्हा शाई फेकीची धमकी; घरूनच विजयस्तंभास दिली मानवंदना

या बैठकीमध्ये खेळाडूंची निवड, त्यांच्यावर असणारा ताण तसेच त्यांचा फिटनेस याबद्दल चर्चा करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे आगामी एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून २० खेळाडूंची कोअर ग्रूपही तयार करण्यात आला आहे. यामधील खेळाडूंना विश्वचषकापर्यंत रोटेट केले जाईल अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com