
आगामी काही दिवसांत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघातील १५ सदस्यांची घोषणा केली. आता यात कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही, असं अजित आगरकरनं स्पष्ट केलं.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यांचा संघ घोषित करण्यात आला. त्यात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. (Latest sports updates)
मात्र, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा, आर. अश्विन, शिखर धवन आणि तिलक वर्मा यांना संधी देण्यात आली नाही.
अजित आगरकरने पत्रकार परिषद घेऊन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. १५ सदस्य संघात असतील. कुणी दुखापतग्रस्त झाला नाही तर, संघात कुठलाही बदल होण्याची शक्यता कमी आहे, असे आगरकरने स्पष्ट केले.
आयसीसीच्या गाइडलाइन्सनुसार, सर्व संघ २८ सप्टेंबरपर्यंत संघात बदल करू शकणार आहेत. मात्र, त्यानंतर काही बदल करायचा असल्यास संबंधित संघांना आयसीसीची परवानगी घ्यावी लागणार आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होईल. तर भारताचा सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.