Viral Cricket Video: सेम टू सेम! तीच ॲक्शन अन् तोच लूक; हुबेहूब शोएब अख्तरसारख्या दिसणाऱ्या गोलंदाजाचा VIDEO व्हायरल

Shoaib Akhtar Duplicate: हुबेहूब शोएब अख्तरसारख्या दिसणाऱ्या गोलंदाजाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Shoaib Akhtar Duplicate
Shoaib Akhtar Duplicatetwitter

Shoaib Akhtar Look Like Mohammad Imran Bowling Video:

रावलपिंडी एक्स्प्रेस हे नाव जरी ऐकलं तरी शोएब अख्तरचा चेहरा समोर येतो. ३० यार्डच्या बाहेरून रनअप अन् ते हवेत उडणारे केस पाहून फलंदाज थरथर कापायचे. आपल्या भन्नाट गोलंदाजीसह तो आपल्या हटके लुकसाठी देखील तितकाच प्रसिद्ध होता.

आता हुबेहूब शोएब अख्तरसारख्या दिसणाऱ्या आणि त्याच्यासारख्याच गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Shoaib Akhtar Duplicate
Asia Cup 2023: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कोण होईल विजेता?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात शोएब अख्तरसारखा दिसणारा गोलंदाज गोलंदाजी करताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही सेंकदांसाठी तुम्हाला असं वाटेल की, हा शोएब अख्तरचा जुना व्हिडिओ आहे.

मात्र असं काहीच नाही. गोलंदाजी करत असलेला गोलंदाज ओमान संघातील आहे. त्याचं नाव मोहम्मद इमरान असं आहे. हा ३७ वर्षीय गोलंदाज लीग क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजी करताना दिसतोय.

अशी आहे मोहम्मद इमरानची कारकिर्द..

मोहम्मद इमरान आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३३ सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. यादरम्यान त्याने ५१ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने १२६६ धावा केल्या आहेत. तसेच ४५ टी-२० सामना खेळताना त्याने ३२ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजीत त्याने ४०९ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

सर्वात वेगवान चेंडू..

शोएब अख्तर हा जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तो ज्यावेळी रनअपवर धावत यायचा त्यावेळी फलंदाज थरथर कापायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा चेंडू शोएब अख्तरच्या नावे आहे. त्याने ताशी १६१.३ किमी इतक्या गतीने चेंडू टाकला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com