Yuvraj Singh 6 Sixes: फ्लिंटॉफ नडला, ब्रॉडला तोडला! युवीच्या ६ षटकारांना १६ वर्षे पूर्ण!पाहा तो ऐतिहासिक क्षण - VIDEO

Yuvraj Singh 6 Sixes Video: युवराज सिंगने १६ वर्षांपूर्वी ६ षटकार मारण्याचा कारनामा केला होता.
on this day in 2007 yuvraj singh smashed 6 sixes in an over in t20 world cup 2007 against england stuart broad
on this day in 2007 yuvraj singh smashed 6 sixes in an over in t20 world cup 2007 against england stuart broad Twitter

Yuvraj Singh 6 Sixes Video:

क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. २००७ मध्ये पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगला होता. या स्पर्धेत एमएस धोनीकडे युवा भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं होतं. ज्यावेळी भारतीय संघ मैदानात उतरला होता त्यावेळी कोणीच असा विचार केला नव्हता की, भारतीय संघ ही स्पर्धा जिंकू शकेल.

मात्र संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ करत पाकिस्तानला अंतिम सामन्यात धुळ चारत भारतीय संघ जेतेपद पटकावलं. या स्पर्धेत युवराज सिंगने मारलेले ६ षटकार कोणीही विसरू शकणार नाही.

on this day in 2007 yuvraj singh smashed 6 sixes in an over in t20 world cup 2007 against england stuart broad
Gautam Gambhir Statement: 'तो NCA मध्ये काय करत होता?',अय्यरबद्दल बोलताना गंभीर भडकला

युवराज सिंग हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. तो किती आक्रमक आहे हे पहिल्याच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पाहायला मिळालं होतं. १९ सप्टेंबर २००७ रोजी भारताचा संघ इंग्लंड संघाविरूद्ध खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. याच सामन्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ६ षटकार खेचत इतिहास रचला होता.

१९ व्या षटकात खेचले ६ षटकार..

अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि युवराज सिंग या दोघांमध्ये लाईव्ह सामन्यात बाचाबाची झाली होती. याचा परिणाम डावातील पुढच्या षटकात पाहायला मिळाला.

इंग्लंड संघाकडून १९ वे षटक टाकण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजीला आला होता. हे षटक २१ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडला किती महागात पडणार आहे, याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

स्टुअर्ट ब्रॉडच्या पहिल्या,दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग ३ षटकार खेचले. पहिल्या ३ चेंडूंवर ३ मोठे फटके बसल्याने स्टुअर्ट ब्रॉड दबावात होता. त्यामुळे चौथा चेंडू त्याने फुल टॉस टाकला ज्यावर युवराज सिंगने खणखणीत षटकार मारला. त्यानंतर पुढील चेंडूवर देखील त्याने षटकार मारला. (Latest sports updates)

सलग ५ चेंडूंवर ५ षटकार मारल्यानंतर डगआऊटमध्ये असलेले सर्व खेळाडू उभे राहिले. युवराज सलग ६ षटकार मारून इतिहास रचणार का? यावर सर्वांच्या नजरा टिकून होत्या. शेवटच्या चेंडूवर त्याने वाईड मिड ऑनच्या दिशेने षटकार मारत इतिहास घडवला.

त्याने एकाच षटकात ६ षटकार मारण्याचा रेकॉर्ड केला. तसेच अवघ्या १२ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक झळकावत, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड देखील केला. हा रेकॉर्ड अजुनपर्यंत कोणालाच तोडता आलेला नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com