सचिन तेंडुलकरची आजच्या दिवशीच विश्वविक्रमाला गवसणी; १५ वर्षे कुणालाच जमलं नाही!

सचिन तेंडुलकरला क्रिकेट विश्वातील 'देव' असे संबोधले जाते.
Sachin Tendulkar World Record (File Photo)
Sachin Tendulkar World Record (File Photo)SAAM TV

मुंबई: १५ वर्षांपूर्वी २००७ साली क्रिकेट विश्वात रचलेला एक विक्रम इतक्या वर्षांनंतरही मोडणे कुणालाही शक्य झालं नाही. महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आजच्या दिवशी वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांत १५००० धावांचा टप्पा पार केला होता. सचिनने २९ जून २००७ रोजी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सचिननं या विक्रमाला गवसणी घातली होती. (Cricket News Update)

वनडे क्रिकेटच्या इतिहासात हा जादुई आकडा गाठणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) एकमेव खेळाडू आहे. विक्रमादित्य सचिनचा हा विक्रम गेल्या १५ वर्षांत कुणालाही मोडता आलेला नाही. सध्या तरी हा विक्रम मोडणारा खेळाडू क्रिकेट (Cricket) विश्वास दिसत नाही, असे सांगितले जात आहे.

Sachin Tendulkar World Record (File Photo)
Wimbledon 2022 : सेरेना विल्यम्स पहिल्याच फेरीत गारद; नदालची आगेकूच

वनडे कारकिर्दीत १८००० हून अधिक धावा

सचिन तेंडुलकरने आपल्या २३ वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. वनडेमध्ये (One Day Cricket) सर्वाधिक धावांचा विक्रम हा त्यातीलच एक आहे. सचिनच्या नावावर ४६३ वनडे सामन्यांमध्ये १८४२६ धावा आहेत.

धावांची सरासरी ४४.८३ इतकी आहे. तर नाबाद २०० धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सचिनने आपल्या वनडे कारकिर्दीत ४९ शतके आणि ९६ अर्धशतके लगावली आहेत. २०१२ मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली होती.

Sachin Tendulkar World Record (File Photo)
विराटला प्रपोज करणारी महिला खेळाडू अर्जुन तेंडुलकरच्या प्रेमात? सोशल मीडियावर चर्चा

संगकाराला विक्रम मोडता आला नाही

सचिन तेंडुलकर याच्यानंतर श्रीलंकाचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारा १५००० धावांच्या खूपच जवळ होता. २०१५ मध्ये निवृत्त होण्याआधी संगकारानं ४०४ सामन्यांमध्ये १४२३४ धावा केल्या होत्या. त्यात २५ शतके आणि ९३ अर्धशतके आहेत. संगकाराच्या धावांची सरासरी ४१.९९ इतकी होती.

विराट कोहली शर्यतीत

सध्याच्या खेळाडूंमध्ये विराट कोहली (Virat Kohli) वनडेमध्ये १५ हजार धावांच्या सर्वात जवळ आहे. त्याने २६० वनडे सामन्यांत १२,३११ धावा केल्या आहेत. १५ हजार धावांचा आकडा गाठण्यासाठी त्याला अजून २६८९ धावांची गरज आहे. एकवेळ अशी होती की, कोहली हा सचिनचा हा विक्रम मोडेल असं बोललं जात होतं. मात्र, गेल्या काही वर्षांत कोहलीचा फॉर्म हरवला आहे. कोहलीला पुन्हा सूर गवसला तर, तो सचिनचा विक्रम मोडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com