GT vs MI Eliminator 2: मुंबईकरांनो फटाके तयार ठेवा!! फायनलचं तिकीट कन्फर्म?

GT vs MI Match Details: : आयपीएल २०२३ स्पर्धेत आज क्लालिफायर २ चा सामना रंगणार आहे.
mumba indians
mumba indianssaam digital

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज क्लालिफायर २ चा सामना रंगणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

कारण हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. विजेत्या संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे मालक मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली आहे.

mumba indians
GT vs MI, IPL 2023 Qualifier 2: धोनीविरुद्ध केलेली चूक रोहितसमोर करणं हार्दिकला पडू शकतं महागात

महत्वाच्या सामन्यापूर्वी मुकेश अंबानी देव दर्शनाला..

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी यांनी बुधवारी, मुलगा अनंत,नातू पृथ्वी आणि सून श्लोका मेहतासोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली आहे.

यावेळी चौघांनीही गणपती बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेले मुकेश अंबानी आपला नातू पृथ्वीला आपल्या कडेवर घेऊन जाताना दिसले.

यावेळी त्यांनी मुंबई इंडियन्स संघाच्या विजयासाठी प्रार्थना देखील केली असं म्हटलं जात आहे. यापुर्वी देखील त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली होती. त्यावेळी देखील मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला होता. (Latest sports updates)

दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना..

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. गुजरात टायटन्स संघाला गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकून चेन्नईच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

तर मुंबई इंडियन्स संघाने एलिमिनेटरच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा धुव्वा उडवत क्लालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आज जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे.

mumba indians
GT vs MI Weather Report: GT vs MI सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण जाणार फायनलमध्ये?

आज होणाऱ्या सामन्यात अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

मुंबई इंडियन्स: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, तिलक वर्मा, पियुष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर/दासून शनाका, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहित शर्मा, मोहम्मद शमी.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com