PAK vs ENG: शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा विजय; मालिकेत पाकिस्तानला व्हाईटवॉश

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लंडसमोर 332 धावांचे भक्कम लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या (PAK vs ENG) फलंदाजांनी दमदार खेळी करत दोन शटके राखून सामना जिंकला.
PAK vs ENG
PAK vs ENGTwitter/ @ECB

मंगळवार, 13 जुलै रोजी इंग्लंडने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय (Pak vs ENG) सामन्यात पाकिस्तानला तीन गडी राखून पराभूत केले. इंग्लंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना जिंकून इंग्लंडने 3-0 ने पाकिस्तानला पराभूत केले. या विजयात मोलाचा वाटा उलणाऱ्या जेम्स विन्सने 102 धावांच्या खेळीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले. त्याच्याशिवाय अष्टपैलू खेळाडू लुईस ग्रेगरीनेही 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) 158 धावांची ऐतिहासिक खेळी देखील कमी पडली. टीम पाकिस्तानकडून हरीस रऊफने 4 आणि शादाब खानने 2 गडी बाद केले.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लंडसमोर 332 धावांचे भक्कम लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार खेळी करत दोन शटके राखून सामना जिंकला. बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानने चांगली फलंदाजी केली, त्या बदल्यात पाकिस्तानने 50 षटकांत 9 विकेट गमावून 331 धावा केल्या. तसेच गोलंदाज ब्रायडन कारसेने इंग्लंडकडून प्रथमच 5 विकेट घेण्यास यशस्वी झाला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लंडसमोर 332 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे पाकिस्तानने मोठी धावसंख्या उभी केली होती. ही भागीदारी मोडल्यानंतर कोणताही फलंदाज मोठी खेळी राहू शकला नाही. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त सलामविर इमाम-उल-हकने 56 धावा केल्या.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com