पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; 'असे' करणारे जगातील पहिलेच बोर्ड

पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना मोठा दिलासा दिला आहे.
PCB
PCB Saam TV

पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना मोठा दिलासा दिला आहे. PCB ने कोरोना महामारीदरम्यान घालण्यात आलेल्या बायो-बबलच्या तसेच कोरोनाच्या बंधनातून आपल्या खेळाडूंची मुक्तता केली आहे. यापुढे पाकिस्तानी खेळाडू बायो-बबलपासून मुक्त असणार आहेत. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा कहर सुरु झाला आणि जगात सर्वच ठिकाणी खेळ स्थगीत झाले, लॉकडाऊन झाला.

हळू हळू निर्बंध उठवले जात होते. सामान्या नागरिकांना निर्बंधातून सुट मिळत होती. मात्र मैदानावर खेळाडूंना कोरोनाचे बायो-बबल सारखे नियम पाळावे लागत होते. पाकिस्तान क्रिकेट लिगही बायो-बबलच्या नियमांत खेळवली गेली. परंतु आता पाकिस्तान बोर्ड हे पहिले असे क्रिकेट बोर्ड आहे ज्यांनी आपल्या खेळाडूंची बायो-बबलच्या नियमांतून सुटका केली आहे.

PCB
IPL 2022 : पुण्यात KKR-LSG आमने-सामने; कोलकत्यासाठी अस्तित्वाची लढाई

पीसीबीचे मीडिया संचालक समी-उल-हसन बर्नी यांनी अधिकृत घोषणा केली आहे की, आगामी वेस्ट इंडिजची पाकिस्तानमध्ये होणारी मालिका कोणत्याही निर्बंधांशिवाय खेळवली जाईल. “पीसीबी हे निर्बंध उठवणारे जगातील पहिले क्रिकेट बोर्ड ठरले आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर जूनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणारी मालिका ही बायो-बबलशिवाय खेळवली जाईल.

हा निर्णय कराचीतील राष्ट्रीय महिला संघाच्या सराव शिबिरापासून लागू होईल आणि 24 मेपासून सुरू होणार्‍या श्रीलंकेविरुद्धच्या नियोजित मायदेशातील मालिकेपर्यंत सुरू राहील. स्पर्धांदरम्यान प्रमुख COVID-19 SoPs विचारात घेतले जाणार नाहीत, परंतु खेळाडूंना लागू केलेल्या नियमांचे पालन करावे लागेल.

ते पुढे म्हणाले "तथापि, खेळाडू आणि अधिकार्‍यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या आणि चाहत्यांपासून सामाजिक अंतरासह प्रमुख एसओपींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातील". पीसीबीने पाकिस्तान कपमध्ये बायो-बबल विरहित स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आणि ही स्पर्धा यशस्वी देखील झाली. बीसीसीआय देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून बायो-बबल आणि इतर कोरोना नियम काढून टाकू शकते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com