Kainat Imtiaz : कोण आहे 'ती' सुंदर दिसणारी तरुणी, जिने 3 शब्दातच दिला बाबर आझमला विजयाचा मंत्र

तिनं एक पोस्ट शेअर करून तीन शब्दात कॅप्शन लिहिलं, त्यानंतर पडला कमेंट्सचा पाऊस
Babar Azam and Kainat imtiaz
Babar Azam and Kainat imtiazsaam tv

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपचा थरार सुरु असून एकाहून एक रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानचा पराभव झालेले दोन्ही सामने प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारे ठरले. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (India vs Pakistan) दारूण पराभव केला. त्यानंतर झिम्बाब्वेनं पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यात एका धावेनं पराभवाची धूळ चारली. या दयनीय अवस्थेमुळं पाकिस्तानला तोंड लपवायची जागाही मिळत नाहीय.

एकीकडे एक माजी क्रिकेटर पाकिस्तानच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठवत आहे, तर दुसरीकडे चाहत्यांनी ट्रोलिंगचा पाऊस पाडला आहे. अशातच आता या परिस्थितीत पाकिस्तानच्या महिला खेळाडूनंही उडी घेतली आहे. तिनं एक पोस्ट शेअर करून तीन शब्दात कॅप्शन लिहिलं आहे. त्यामुळे बाबर आझमच्या पाकिस्तानी सेनेला तीन शब्दांचा मंत्र देऊन या महिला खेळाडूनं एकप्रकारे खिल्लीच उडवली आहे. (Babar Azam pakistan cricket team latest news update)

पाकिस्तानची महिला क्रिकेटर कायनात इम्तियाजनं (Kainat imtiaz) इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून लिहिलं,विज्वलाईज करा, फोकस करा आणि एक्जिक्यूट करा (Visualize - Focus - Execute) त्यानंतर तर लोकांनी पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघावर टीका टीपण्णी करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिलं, बाबर आझमच्या टीमला काहितरी समजून सांगा.

Babar Azam and Kainat imtiaz
IND vs SA : भारत विरुद्ध आफ्रिका, कोण कुणावर भारी? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

एका महिला युजरनं लिहिलं, तुम्ही दोष लावणं विसरलात (पाकिस्तानच्या टीमला टार्गेट करून).यावर एका युजरनं रिप्लाय करून म्हटलं, सीमा ओलांडण्यासाठी रस्ता खुला करा. दुसऱ्या एका युजरनं विचारलं, तुम्ही इन्स्टाग्रामवर पण आहात का? तसंच दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, जर तुम्ही मॉडलिंग मध्ये काम केलं असतं,तर तुम्हाला खूप पैसे कमावता आले असते.

Babar Azam and Kainat imtiaz
T20 World Cup Points Table: ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमधून बाहेर जाणार? सर्व संघांची माहिती वाचा सविस्तर

भारतानं पाकिस्तानला चारली धूळ

भारत आणि पाकिस्तान संघात मेलबर्नच्या मैदानावर २३ ऑक्टोबरला महामुकाबला झाला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यांत भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या हे या विजयाचे खरे हिरो ठरले. त्यांच्या जबरदस्त खेळीनेच भारतीय संघाने १६० धावांचं लक्ष गाठलं. शेवटच्या षटकात टीम इंडियाला विजयासाठी तब्बल १६ धावांची गरज असताना, नाट्यमय घडामोडी घडल्या. यामुळे काही वेळ तमाम भारतीय क्रिडाप्रेमींचं टेन्शन वाढलं होतं. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com