PAK vs AFG: पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय! काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं? वाचा सविस्तर

Reasons Behind Pakistan Defeat: काय आहेत पाकिस्तानच्या पराभवाची प्रमुख कारणं? वाचा सविस्तर
pakistan cricket team
pakistan cricket teamtwitter

Reasons Behind Pakistan Defeat:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत तिसरा मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पाकिस्तानने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत.

या ५ पैकी ३ सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अफगाणिस्तानने वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदांच पाकिस्तानला पराभूत केलं आहे. दरम्यान काय आहेत या पराभवाची प्रमुख कारणं? जाणून घ्या.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

निर्धाव चेंडू..

चेन्नईच्या खेळपट्टीवर पाकिस्तानच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. पाकिस्तानचे फलंदाज चौकार आणि षटकार मारण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे एकेरी, दुहेरी धावा जास्त होत नाहीत.

हेच कारण आहे की, फलंदाजांना स्ट्राईक रोटेट करणं कठीण जातं. पाकिस्तानचे फलंदाज मोठे फटके खेळण्यावर अधिक भर देताना दिसून येत आहेत. या नादात निर्धाव चेंडूंची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरतोय.

बाबर आझमचं नेतृत्व..

बाबर आझमला कर्णधार म्हणून आपली छाप सोडता आलेली नाही. या स्पर्धेत त्याचा नेतृत्वाचा पॅटर्न एकसारखाच राहिला आहे. त्यामुळे तो पुढे काय करणार याची विपक्षी संघाला पुरेपूर कल्पना असते. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात रक्षात्मक नेतृत्व करताना दिसून आला. त्याच्या नेतृत्वात ती आक्रमकता दिसून आली नाही. याचा फायदा अफगाणिस्तानला झाला. (Latest sports updates)

pakistan cricket team
IND vs NZ: फिल्डिंग कोचचा नवा अविष्कार! मोठ्या स्क्रीनवर नव्हे तर हटके पद्धतीने केली बेस्ट फिल्डरची घोषणा; Video

फिरकी गोलंदाजाची कमतरता..

पाकिस्तान संघात फिरकी गोलंदाज आहेत. मात्र त्यांना दर्जेदार फिरकी गोलंदाजाची कमतरता जाणवतेय. वर्ल्डकपचे सामने भारतात सुरू आहेत. त्यामुळे फिरकी गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.

संघातील मुख्य फिरकी गोलंदाज शादाब खान आणिन उसामा मिरला आतापर्यंत एकही गडी बाद करता आलेला नाही. तर इफ्तिकार अहमदने काही प्रमाणात धावा थांबवल्या. मात्र त्यालादेखील एकही गडी बाद करता आलेला नाही. या कारणांमुळे पाकिस्तानला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

pakistan cricket team
World Cup 2023: रोहित -विराटचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मैदानात नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com