एका रात्रीसाठी खेळाडूने दिली होती 43 लाखांची ऑफर; प्रसिद्ध Modelचा खुलासा

फ्रेंच मॉडेल नताली एंड्रियानी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
एका रात्रीसाठी खेळाडूने दिली होती 43 लाखांची ऑफर; प्रसिद्ध Modelचा खुलासा
एका रात्रीसाठी खेळाडूने दिली होती 43 लाखांची ऑफर; प्रसिद्ध Modelचा खुलासाSaam Tv

पॅरिस: फ्रेंच मॉडेल नताली एंड्रियानी nathalie andreani एक खळबळजनक खुलासा केला आहे. रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि OnlyFan ब्यूटी नताली एंड्रियानीने फ्रान्सच्या राष्ट्रीय टीममधील फुटबॉलपटूवर केलेल्या आरोपामुळे सध्या खळबळ उडाली आहे. ती म्हणाली की, एका प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूला तिच्यासोबत रात्र घालवायची होती आणि त्यासाठी त्याने तिला एक मोठी रक्कम देऊ केली होती. 50 वर्षीय अँड्रियानीने एका फ्रेंच नियतकालिकाला याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाले, 'जरी त्याच्याकडे अनेक असे प्रस्ताव आले असले तरी ही बाब पूर्णपणे वेगळी होती. कारण एका मोठ्या फुटबॉलपटूचे नाव त्याच्याशी जोडलेले होते.

हे देखील पहा-

वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, नेटली एंड्रियानी सांगितले की, फुटबॉलपटूने तिच्यासोबत रात्र घालवण्यासाठी 50 हजार युरो (म्हणजे सुमारे 43,25,676 रुपये) देऊ केले होते. मात्र, तिने ही ऑफर नाकारली. मॉडेलने सांगितले की, ज्या खेळाडूने ऑफर दिली ती फ्रेंच राष्ट्रीय संघाशी संबंधित होता. आणि ही गोष्ट खूप लाजिरवाणी आहे. मला असे वाटले नव्हते की तो असे काही करेल.

एका रात्रीसाठी खेळाडूने दिली होती 43 लाखांची ऑफर; प्रसिद्ध Modelचा खुलासा
डोंबिवली: MIDCची जलवाहिनी फुटली; तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी

ही ऑफर देणाऱ्या खेळाडूचे नाव मात्र नतालीने उघड केले नाही. ती पुढे म्हणाली की मी 50 वर्षांची आहे आणि लैंगिकदृष्ट्या प्रौढ आहे. मी अशा गोष्टी शोधत आहे जे मी यापूर्वी कधीही शोधले नव्हते. मला माझ्या आवडीच्या माणसाशी संबंध ठेवण्यास हरकत नाही, पण मी ते पैशासाठी करत नाही. म्हणून जेव्हा फुटबॉलपटूने मला ऑफर केली तेव्हा मी त्वरित ती नाकारली. परंतु या खुलास्यानंतर आता ते फ्रेंच खेळाडूचे नाव जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.