नवी मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामान्यांसाठी पोलीस सज्ज

नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानात एकूण 20 सामने खेळले जाणार आहेत.
Police
PoliceSaam Tv

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई - डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय मैदानावर तब्बल 10 वर्षानंतर आयपीएल चे सामने रंगणार आहेत. येत्या 27 तारखेला येथे पहिला सामना होणार आहे. आयपीएल सामन्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस सज्ज झाली असून नवी मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानात एकूण 20 सामने खेळले जाणार आहेत. यातील 4 सामने दिवसा आणि 16 सामने सायंकाळी खेळविण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलीस (Police) यासाठी कडक बंदोबस्त तैनात करणार आहे.

पोलीस महासंचालक यांच्याकडून मिळालेला पोलीस बंदोबस्त आणि नवी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त एकत्रितपणे बंदोबस्तावर असणार आहेत. यासाठी 3 पोलिस उपायुक्त, 12 सहाय्यक पोलीस उपायुक्त, 45 पोलीस निरीक्षक, 120 पोलीस उपनिरीक्षक आणि 1100 पोलीस कर्मचारी असे तब्बल 1300 पोलीस अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेत. यासोबत राज्य राखीव दलाचे 100 जवान राखीव राहणार आहेत.

हे देखील पहा -

नवी मुंबई पोलिसांची 2 जलद गती पथक, 2 दंगल नियंत्रण पथक रिसर्व कंट्रोल रूमला राहणार असून साध्या वेशात गुन्हे शाखा व इतर शाखांचे 150 पेक्षा अधिक कर्मचारी देखील तैनात असणार आहेत. याव्यतिरिक्त ट्रिक या खाजगी संस्थेचे सुरक्षा रक्षक तसेच डी वाय पाटील संस्थेचे 400 सुरक्षा रक्षक देखील बंदोबस्तात असणार आहेत.

Police
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

आयपीएल सामान्यांसाठी सध्या 25 टक्के प्रेक्षक संख्येलाच परवानगी असली तरी वाहतुकीचे दवखील चोख नियोजन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केल आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी 2 सहाय्यक पोलीस उपायुक्त, 15 पोलीस निरीक्षक, 25 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 350 कर्मचारी तैनात असणार आहेत. सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंग ची व्यवस्था करण्यात आलेय तिकिटावर असणाऱ्या क्यूआर कोडच्या माध्यमातून पार्किंगची व्यवस्था कुठे आहे याची माहिती प्रेक्षकांना भेटणार असून तिकिटावर सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याची माहिती यावेळी पोलीस उपयुक्तांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com