Paralympics : चूरशीच्या लढतीत पलक, प्रमाेदच्या यशास हुलकावणी

Paralympics : चूरशीच्या लढतीत पलक, प्रमाेदच्या यशास हुलकावणी
palak kohli paramod bhagat

टाेकियाे : tokyo paralympics मध्ये बॅडमिंटनपटू कृष्णा नागर याच्या बहारदार कामगिरीनंतर भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष प्रमोद भगत आणि पलक कोहली palak kohli paramod bhagat यांच्या मिश्र दुहेरी SL3 -SU5 च्यावर्गवारीमधील पॅराबॅ़डमिंटन सामन्यावर हाेते. कास्यपदकासाठी झालेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंना जपानच्या डी फुजीहारा आणि ए सुगिनो या जोडीस नमविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही. pramod-bhagat-palak-kohli-lose-to-daisuke-fujihara-akiko-sugino-para-badminton-sml80

पलक आणि प्रमाेद यांनी प्रारंभापासून जपानच्या जाेडीस जबरदस्त टक्कर दिली. परंतु काही वेळेस दाेघांमधील समन्वयचा अभाव कमी पडल्याचे जाणवले. दरम्यान या सामन्यात त्यांना २३-२१, २१-१९ असा पराभव स्विकारावा लागला.

palak kohli paramod bhagat
नाद खूळा; प्रद्युम्नची स्कॉटिश घाेडेसवारी अजिंक्यपदसाठी निवड

या सामन्यात दाेन्ही भारतीय खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीचा सर्वांनाच अभिमान वाटला परंतु यशास हुलकावणी दिल्याने क्रीडाप्रेमींमध्ये कमालाची नाराजी पसरली. पॅरालिंपिकमधील भारतीयांसाठी हा शेवटचा सामना हाेता. आजपर्यंत यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने १९ पदके जिंकली आहेत. आत्तापर्यंतच्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारतीय संघाने १२ पदके मिळवली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com