Maharashtra Kesari News : मैदान मारलं! प्रतीक्षा बागडी ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

First Women Maharashtra Kesari, Pratiksha Bagdi :पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा पहिला बहुमान प्रतिक्षा हिने मिळवला आहे.
Maharashtra Kesari News Update
Maharashtra Kesari News Update Saam tv

सांगली : सांगलीमध्ये रंगलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हिने बाजी मारली आहे. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा पहिला बहुमान प्रतिक्षा हिने मिळवला आहे. लपेट डावावर प्रतीक्षा बागडीने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला चितपट करत बाजी मारली. या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास यावेळी चांदीची गदा ,महाराष्ट्र केसरी 'किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. (Latest Marathi News)

महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीमध्ये (Sangli) पार पडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा तालीम संघाने सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी मॅट वरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, आणि दोन दिवस या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या.45 किलो वजनी गटापासून 76 किलो वजनी गटात या कुस्त्या स्पर्धा संपन्न झाल्या.

Maharashtra Kesari News Update
Virat Kohli Hairstyle: आहा कडक! IPLसाठी कोहलीची झक्कास हेअर स्टाइल,बॉलीवूड स्टार्सला ही सोडलंय मागे -PHOTO

सर्व गटात अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या कुस्त्या पार पडल्या.आणि महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीची प्रतीक्षा बागडी आणि कल्याणच्या वैष्णवी पाटील हिच्यात अंतिम लढत झाला,ज्यामध्ये  प्रतीक्षा हिने लपेट डावावर् वैष्णवीला अवघ्या दोन मिनिटात चितपट करत विजय मिळवला आहे,आणि पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब हा सांगली जिल्ह्याला मिळवला आहे.

Maharashtra Kesari News Update
Cricket News: Asia Cup चे आयोजन पाकिस्तानात! टीम इंडिया स्पर्धेतून घेणार माघार?

महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या प्रतीक्षा बागडी हिला सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी,जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या व मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा,महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com