चूरशीच्या लढतीत प्रवीण कुमाराची अव्वल कामगिरी; भारतास ११ वे पदक

Praveen Kumar
Praveen Kumar

टाेकियाे: येथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत tokyo paralympics 2020 आजच्या दिवसाची सुरुवात भारतीयांसाठी सुखावून गेली. प्रवीण कुमारने Praveen Kumar उंच उडी क्रीडा प्रकारात देशास राैप्य पदक मिळवून दिले. प्रवीणने पुरुषांच्या टी ६४ या गटात ही कामगिरी साधली आहे. उंच उडीत देशास मिळालेले हे तिसरे पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरिअप्पन यांनीही पुरुषांच्या गटात देशासाठी रौप्यपदक पटकावले होते. त्याचबरोबर देशाचे आतापर्यंत जिंकलेले हे ११ वे पदक आहे.

१८ वषीर्य भारतीय प्रवीण कुमारने २.०७ मीटर इतकी उंच उडी घेऊन ही कामगिरी साध्य केली.त्याची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी त्याची वैयक्तिक सर्वोत्तम २.०५ मीटर उडी अशी कामगिरी होती. या नवीन वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह प्रवीण कुमारने एक नवीन अथेनियन रेकॉर्डची नाेंद केली आहे.

आजच्या स्पर्धेत ब्रिटनचा ब्रूम एडवर्ड्स हा २.१० मीटर उंच उडी घेऊन सुवर्णपदकाचा दावेदार ठरला. प्रवीणला आव्हान देणारा लॅपिआटोने २.०४ मीटर उंच उडी टाकून कास्यपदक जिंकले.

चूरशीच्या लढतीत प्रवीण ठरला अव्वल

प्रवीण कुमार आणि लेपियाटो यांच्यात निकराची झुंज झाली. दोघांनी १.९७ मीटर, २.०१ मीटर आणि २.०४ मीटर चे गुण सहरित्या मिळविले. या दोघांमध्ये चूरस सुरु होती. यानंतर दोघांसाठी २.०७ मीटर ध्येय निश्चित करण्यात आले. पहिल्याच प्रयत्नात दाेघांना ते प्राप्त करण्यात यश लाभले नाही. दुसऱ्या प्रयत्नात भारताच्या प्रवीणने ते सहजरित्या पार करीत रौप्य पदकावर भारताची माेहाेर उमटवली.

Praveen Kumar
आज जी परिस्थिती माझ्यावर आली ती दुस-यावर येऊ नये : संभाजीराजे

भारतासाठी आजची सकाळ उत्साहवर्धक ठरली

टोकियो पॅरालिंपिकमध्ये कालचा दिवस भारतीयांसाठी निराशजनक ठरला परंतु आजची (शुक्रवार) सकाळ भारतासाठी उत्साहवर्धक ठरली. भारतीय खेळाडू प्रवीण कुमारने या दिवसाची सुरुवात रौप्य पदक जिंकून केली. त्याचबरोबर इतर खेळांमध्ये विजयासह भारतीय पॅरा-अॅथलीट पदकांच्या आशा वाढवताना दिसत आहेत.

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत तरुण ढिल्लन, सुहास यांनी आपापले सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताच्या पलक कोहली आणि प्रमोद भगत यांनीही मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. या व्यतिरिक्त भारतीय तिरंदाजांनी पुढील फेरी गाठण्यात यश मिळवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com