Wrestler Died In Field: सराव करतानाच कोसळला, मग उठलाच नाही; महाराष्ट्र चॅम्पियनने अखाडयातच घेतला अखेरचा श्वास

पुण्यातील कुस्तीपटूला हृदय विकाराचा झटक्यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे
Swapnil padale
Swapnil padaleFacebook

Wrestler Dies From Heart Attack: बुधवारी कुस्ती प्रेमींसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. पुण्यातील कुस्तीपटूला हृदय विकाराच्या झटक्यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे.

पुण्यातील ३१ वर्षीय कुस्तीपटू स्वप्नील पाडाळेने (Swapnil padale) लाल मातीच्या अखाड्यात आपला शेवटचा श्वास घेतला आहे. (Latest sports updates)

Swapnil padale
IND VS AUS: अंतिम कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल,'या' ३ खेळाडूंना रोहित ठेवणार संघाबाहेर

पुण्यातील मारुंजी इथे असलेल्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात आज सकाळी ७:३० वाजता ही घटना घडली.

पैलवान सरावाला सुरुवात करण्यापूर्वी सपाट्या मारत असतात. मात्र सपाट्या मारतानाच तो पडला आणि त्यानंतर पुन्हा उठलाच नाही.

Swapnil padale
IND VS AUS 4th Test: फलंदाज म्हणून जे गावसकर - अझहरुद्दीनलाही नाही जमलं; ते करत हिटमॅन रचणार इतिहास

सपाट्या मारताना तो खाली आधळला आणि त्यानंतर त्याला जाग आलीच नाही. तो खाली पडल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला उचललं आणि तात्काळ त्याला रुग्णालयात हलवलं. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच त्याने जीव सोडला होता.

स्वप्नीलने महाराष्ट्र चॅम्पियनचा खिताबही पटकावला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्यानेच झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com