IPL 2023 Playoff Equation: दिल्लीच्या विजयाने वाढलं पंजाबचं टेन्शन! तर 'हे' ३ संघ करू शकतात Playoff मध्ये प्रवेश

IPL Playoffs Scenario: आयपीएल २०२३ स्पर्धेत प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ कोणते असणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये.
ipl points table
ipl points table saam tv

IPL 2023 : आयपीएल २०२३ स्पर्धेत प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ कोणते असणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. या स्पर्धेतील ६ सामने शिल्लक आहेत. बुधवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आणि १५ धावांनी विजय मिळवला.

या विजयाचा दिल्लीला काहीच फायदा नाही झाला. मात्र पंजाबचे या स्पर्धेतील आव्हान आता संपले आहे. आता शेवटचा सामना जिंकून पंजाब संघाला दुसऱ्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.

ipl points table
IPL Points Table: CSK अन् MI ची चिंता वाढली! सोप्या भाषेत समजून घ्या प्लेऑफचं समीकरण

या संघांना आहे प्लेऑफमध्ये जाण्याची संधी..

चेन्नई सुपर किंग्ज:

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ १५ पॉइंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. चेन्नईचा शेवटचा सामना हा दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध रंगणार आहे.

हा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्ज संघाला थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार आहे. मात्र पराभूत झाल्यास चेन्नईला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.

लखनऊ सुपर जायंट्स:

लखनऊ सुपर जायंट्स संघ १५ पॉइंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात जर लखनऊ सुपर जायंट्स संघाने विजय संपादन केला.

तर थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार आहे. मात्र जर लखनऊ सुपर जायंट्स संघाने हा सामना गमावला तर या संघाला चेन्नई, मुंबई आणि बंगळुरू या संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.

ipl points table
IPL 2023 Playoffs: LSG विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई स्पर्धेतून बाहेर? तर या २ संघांची लागली लॉटरी; पाहा समीकरण

मुंबई इंडियन्स :

मुंबई इंडियन्स संघाला टॉप ४ मध्ये जाण्यासाठी हैदराबाद विरुध्द होणाऱ्या सामन्यात कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. इतकेच नव्हे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला कमीत कमी एका सामन्यात तरी पराभूत झाला पाहिजे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ १२ पॉइंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. या संघाचे आणखी २ सामने शिल्लक आहेत. जर प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. तसेच मुंबईचा संघ हरला पाहिजे अशी प्रार्थना देखील करावी लागेल. (Latest sports updates)

ipl points table
IPL 2023, MI vs LSG: रोहित शर्माची एक चूक अन् स्टॉयनिसने साधली संधी; लखनौचे मुंबईला १७८ धावांचे आव्हान

राजस्थान रॉयल्स:

राजस्थान रॉयल्स १२ पॉइंट्स सह सहाव्या स्थानी आहे. या संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अंतिम सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. तसेच मुंबई,पंजाब, बंगळुरू आणि कोलकाताने सर्व सामने गमवावे अशी प्रार्थना देखील त्यांना करावी लागणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स:

कोलकाता नाईट रायडर्स संघ १२ पॉइंट्ससह सातव्या स्थानी आहे. या संघाला देखील आपला अंतिम सामना जिंकून मुंबई, बंगळुरू, राजस्थान आणि पंजाबच्या पराभवाची प्रार्थना करावी लागणार आहे.

पंजाब किंग्ज:

पंजाब किंग्ज संघाचं या स्पर्धेतील आव्हान जवळजवळ संपलं आहे. कारण १२ पॉईंट्ससह हा संघ आठव्या स्थानी आहे. अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासह पंजाब संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. तर दिल्ली आणि हैदराबादचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com