पीव्ही सिंधूने पटकाविले Syed Modi International Badminton चे अजिंक्यपद; मालविका बनसाेड उपविजेती

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत मालविकाने साईना नेहवालचा पराभव करुन काैतुकाची थाप मिळविली हाेती. परंतु आजच्या सामन्यात तिचा सिंधूपुढं टिकाव लागू शकला नाही.
PV Sindhu
PV SindhuSaam Tv

लखनौ : सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन (Syed Modi India International Badminton Championship) स्पर्धेत आज महिला एकेरीतील अंतिम सामन्यात अव्वल मानांकित पीव्ही सिंधूने नवाेदित बॅडमिंटनपटू (badminton) मालविका बनसाेडचा पराभव करुन अजिंक्यपद पटकाविले. मालविका (malvika bansod) सिंधूला (PV Sindhu) उत्तम टक्कर देईल अशी आशा हाेती परंतु ती फाेल ठरली.

PV Sindhu
Abhijeet Bichukale: बिग बॉस 15; साता-याच्या अभिजीत बिचुकलेचं आव्हान संपुष्टात?

सिंधूच्या अनुभवापुढं आज महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मालविकाचा टिकाव लागला नाही. सिंधूने मालविकाचा २१-१३, २१-१६ असा पराभव केला. दरम्यान सामन्या दरम्यान मालविकाने मिळविलेले काही गुण वाखण्याजाेगे ठरले.

इशान भटनागर- तनिषा कॅस्ट्रोने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांनी २१-१६, २१-१२ अशी टी.एच. नागेंद्र बाबू - एस. गुराझादा या जाेडीचा पराभव केला. दरम्यान अरनॉड मर्क्ले आणि लुकास क्लेरबाउट यांच्यातील पुरुष एकेरीच्या लढतमधील स्पर्धकास COVID-19 आढळल्यानंतर सामना रद्द करण्यात आला.

PV Sindhu
Australian Open 2022: अमांडा अ‍ॅनिसिमोव्हाने गतविजेत्या Naomi Osaka ला हरवलं
PV Sindhu
Poonam Pandey: पाॅर्न फिल्म प्रकरणात पूनम पांडेला सर्वाेच्च न्यायालयात मिळाला दिलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com