Indian Wells: इंडियन वेल्सच्या उपांत्य फेरीत Rafel Nadal; १९-० चा नाेंदविला विक्रम

उपांत्य फेरीत नदालचा सामना स्पेनच्या १८ वर्षीय कार्लोस अल्काराजशी होईल. ज्याने गतविजेता आणि १२ व्या मानांकित कॅमेरॉन नूरीचा पराभव केला.
Rafael Nadal
Rafael Nadal Saam Tv

स्पेन : इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील (Indian Wells tennis tournament) उपांत्यपुर्व फेरीत स्पॅनिश स्टार राफेल नदालने (Rafael Nadal) निक किर्गिओसचा (Nick Kyrgios) ७-६ (०), ५-७, ६-४ असा पराभव केला. या विजयासह नदालने यंदाच्या हंगामातील (tennis) १९-० असा विजयचा विक्रम स्थापित केला आहे. सन १९९० नंतर हंगामातील ही तिसरी सर्वोत्तम सुरुवात असल्याचे क्रीडाक्षेत्रात बाेलले जात आहे. दरम्यान उपांत्य फेरीत नदालची लढत स्पेनच्याच कार्लोस अल्काराज (Carlos Alcaraz) याच्याशी हाेणार असल्याने स्पेनच्या क्रीडाक्षेत्रात (sports) दाेघांच्या सामन्याची उत्सकुता लागून राहिली आहे. (Rafael Nadal Latest Marathi News)

सामना संपल्यानंतर नदाल म्हणाला, “मी त्या तिसऱ्या सेटबद्दल आनंदी आहे कारण दुसऱ्या सेटनंतर तो सोपा नव्हता. माझ्यासाठी ताे धाेकादायक हाेता परंतु मी भावनिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहून लढा सुरू ठेवला आणि त्यात यश मिळविले.

दरम्यान या सामन्यातील पराभव किर्गिओसला पचवता आला नाही. त्याने आपला राग रॅकेटवर काढला. सामना संपल्यानंतर त्याने कोर्टवरच आपले रॅकेट ताेडले. यावर किर्गिओस म्हणाला, “ते (रॅकेट) माझ्या पायापासून एक मीटर दूर पडले आणि घसरले. साहजिकच ही अत्यंत दुर्दैवी घटना होती.

Rafael Nadal
World Cup: Do Or Die च्या स्थितीत इंग्लंडने मारली बाजी; भारतीय संघ हरला

त्यावेळी नदाल कोर्टाच्या दुसऱ्या बाजूला होता. नदाल म्हणाला की त्याने किर्गिओसला त्याचे रॅकेट मारताना पाहिले नाही. आजच्या सामन्यात त्याने निकराची झुंज दिली. भावनेच्या बाबतीत आणि अर्थातच त्याचे व्यक्तिमत्त्व, त्याचे चारित्र्य खूप चांगले आहे. कधीकधी तो मला आवडत नसलेल्या गोष्टी करतो, परंतु मी वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा, भिन्न दृष्टीकोनांचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाचा आदर करतो अशी टिप्पणी देखील नदालने केली.

Edited By : Siddharth Latkar

Rafael Nadal
Barshi: हुतात्मा रामेश्वर काकडे यांना गौडगावात साश्रुपुर्ण नयनांनी निराेप
Rafael Nadal
गाेवेकरांवर PM Modi खूष; प्रमाेद सावंतांच्या भेटीत माेदींनी दिलं हे वचन

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com