रैनाच्या 'ब्राह्मण' वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रचंड संताप

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना वादात कचाट्यात अडकताना दिसुन येत आहे.
रैनाच्या 'ब्राह्मण' वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रचंड संताप
रैनाच्या 'ब्राह्मण' वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रचंड संतापSaam Tv

नवी दिल्ली : भारतीय Indian संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना Suresh Raina वादात कचाट्यात अडकताना दिसुन येत आहे. रैनाने तमिळनाडू Tamil Nadu प्रीमियर Premier लीग येथील सामन्यांमध्ये कॉमेंट्री करत असताना एक वक्तव्य केले होते की, या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. रैना म्हणाला होता की, मी एक ब्राह्मण आहे, यामुळे मला चेन्नईची Chennai संस्कृती आपलीसी करण्यास जास्त अडचणी निर्माण झाल्या नाहीत.

रैनाचे हे वक्तव्य अनेकांना आवडले नाही. यामुळे सोशल मीडियावर social media चर्चांना चांगलेच पेव फुटले आहे. रैना इंडियन प्रीमियर लीगमध्ये आयपीएल IPL चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत असतो. तमिळनाडू प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात सुरेश रैना कॉमेंट्री टीम मध्ये सहभागी झाले होते. सामन्याच्या वेळी सहकारी कॉमेंटेटरने सुरेश रैनाला दक्षिण भारताच्या संस्कृती बद्दल कशाप्रकारे जुळवून घेत आहे असा प्रश्न विचारला असता.

हे देखील पहा-

यावर रैना म्हणाला की, मी एक ब्राह्मण आहे. मी चेन्नई या ठिकाणी २००४ मध्ये खेळलो आहे. मला याठिकाणची संस्कती, खेळाडू यांच्याकडून मिळालेले प्रेम आहे. मी अनिरुद्ध श्रीकांत, बद्रीनाथ आणि बाला भाई लक्ष्मीपती बालाजी यांच्यासोबत देखील खेळलो आहे. आमच्या सीएसकेच्या टीमचे चांगले प्रशासन आहे आणि आमचे कौशल्य दाखवण्याकरिता पूर्ण वाव आहे.

रैनाच्या 'ब्राह्मण' वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रचंड संताप
राज ठाकरेंनी मास्क लावल्याने सोशल मीडियावर चर्चा

मला या ठिकाणची संस्कृती खूप आवडते आणि मी सीएसकेचा CSK भाग असल्यामुळे स्वत:ला भाग्यवान मानतो, असे रैना यांनी सावली सांगितले आहे. स्वत: ला ब्राह्मण म्हणून सांगितल्यामुळे रैनावर ही टीका केली जात आहे. अनेकांनी रैनाकडे माफी मागण्याची मागणी देखील केली आहे. सुरेश रैनाने आपल्या आयपीएल करियरची सुरुवात देखील चेन्नई सुपर किंग्ज सोबतच केली आहे.

तो अद्याप या टीमचा एक भाग म्हणून आहे. रैनाने धोनीच्या नेतृत्वातुन सीएसकेकडून खेळत असताना अनेक वेळा उत्तम प्रकारची चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. रैनाने गेल्या वर्षी १५ ऑगस्टला धोनीने निवृत्ती घेतल्यावर काही मिनिटात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले होते. तो इंडियन प्रीमियर लीगचा १४ व्या सीझनच्या ३१ सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com