Raj Kundra - वादांचा 'राजा'; पॉर्न फिल्मपासून IPL पर्यंत अनेक प्रकरणे गाजली
Raj Kundra & Shilpa ShettySaam Tv

Raj Kundra - वादांचा 'राजा'; पॉर्न फिल्मपासून IPL पर्यंत अनेक प्रकरणे गाजली

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्सचा (RR) माजी सह-मालक राज कुंद्रा (Raj Kundra) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्सचा (RR) माजी सह-मालक राज कुंद्रा (Raj Kundra) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राजला सोमवारी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अश्लील चित्रपट बनवून अॅप्सद्वारे दाखविल्याबद्दल अटक केली आहे. आज त्याला पोलिसांद्वारे कोर्टात हजर केले जाईल. मुंबई पोलिसांनी या पोर्नोग्राफी रॅकेटचा भांडाफोड केला आहे. याची माहिती देताना आयुक्त हेमंत नागराळे म्हणाले ''कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून त्याच्याविरूद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत''.

राज कुंद्रा यासारख्या गंभीर प्रकरणात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. वादविवादाशी राजचे घट्ट नाते आहेत. 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सचे सह-मालक राज कुंद्राला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोपी बनवून दिल्ली पोलिसांनी अटक केले होते. त्यानंतर राज कुंद्राने आयपीएलमध्ये बेटींग केल्याची कबुली दिली होती. यामुळे आयपीएलमधून त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

Raj Kundra & Shilpa Shetty
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार?

याच प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू - वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेला यांनाही पोलिसांनी अटक केली होती. हे स्पॉट फिक्सिंग प्रकरण समोर आल्यानंतर राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. तर 2015 पासून राज कुंद्रावर आयपीएलमध्ये आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त उद्योगपती राज कुंद्रा अन्यही अनेक प्रकरणात अडकला आहे. यापूर्वी अभिनेत्री पूनम पांडेने कुंद्रावर तिच्या छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप लावून मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सन 2017 मध्ये 24 लाखांच्या घोटाळ्याचा आरोपही कुंद्रावर आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांना वस्त्रोद्योग कंपनीची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या संदर्भातील निर्णय अद्याप आलेला नाही.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com