
मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या १५ व्या (IPL 2022) पर्वात एकाहून एक रंगतदार लढत पाहायला मिळत आहेत. प्रतिस्पर्धी संघाविरोधात सामना जिंकण्यासाठी सर्वच खेळाडू कंबर कसत आहेत.आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी उत्तम क्षेत्ररक्षण करण्याकडेही खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावलं आहे. पंजाब किंग्ज (Punjab kings) आणि राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan royals) लढतीत एका दिग्गज खेळाडूनं अप्रतिम झेल पकडत क्रिकेटप्रेमींची वाहवा मिळवली आहे. जोस बटलर असं त्या खेळाडूचं नावं आहे. राजस्थानच्या संघाचा कणा असलेला सलामीवीर फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) हवेत उडी मारुन एक हातात झेल पकडत क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केलीय.पंजाबचा फिरकी गोलंदाज आर आश्विन सहावं षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवर शिखर धवनने (Shikhar Dhawan) मिड ऑनच्या दिशेनं मोठा फटका लगावला. त्यानंतर मैदानात तळ ठोकून बसलेल्या जॉस बटलरने हवेत उडी मारत शिखरला झेलबाद केले.धवनने १६ चेंडूत अवघ्या १२ धाव्या केल्या.
जॉस बटलरने सुपरमॅनसारखी उडी मारत झेल घेवून शिखरला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्टेडियममध्ये असलेल्या क्रिकेटप्रेमींनी टाळ्यांच्या गजरात जोस बटलरवर स्तुतीसुमनं उधळली. जॉसने घेतलेल्या अप्रतिम झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.जॉनी बेयरस्टोसोबत शिखरने ४७ धावांची भागिदारी केली.दरम्यान, शिखर धवनने आश्विनच्या गोलंदाजीत आतापर्यंत ९७ चेंडूंचा सामना केला असून ८५ धावांची खेळी केली आहे. याचदरम्यान आश्विनने शिखरला चारवेळा बाद केलं आहे.
जितेश शर्मानं १८ चेंडूत केली नाबाद ३८ धावांची खेळी
पंजाब किंग्जचा विकेटकिपर आणि फलंदाज जितेश शर्मानं १८ चेंडूत नाबाद ३८ धावांची खेळी केली आहे. यामध्ये चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.तर भानुका राजपक्षेनं २७ धावा केल्या आहेत.कर्णधार मयंक अग्रवालने सुमार कामगिरी करत १३चेंडूत १५ धावाच केल्या. तसंच यंदाच्या हंगामात कमालीचा फॉर्ममध्ये असलेला राजस्थानच्या फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. चहलने चार षटकांत २८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.