IPL 2022 Final : गुजरात टायटन्स- राजस्थान रॉयल्सची आज जेतेपदासाठी झुंज, 'ही' आहे बेस्ट फॅंटेसी XI

काय आहेत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघाचे संभाव्य प्लेईंग इलेव्हन ?
Hardik pandya and sanju samson
Hardik pandya and sanju samsonsaam tv

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलच्या १५ पर्वाचा (IPL 2022) अंतिम सामना नव्यानं पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि पहिल्याच आयपीएलवर जेतेपद मिळवणाऱ्या राजस्थना रॉयल्स मध्ये होणार आहे. आयपीएल २०२२ ची फायनल आज रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री ८ वाजता होणार आहे. दरम्यान यंदाच्या मोसमात नव्या नवलाईनं दाखल झालेला गुतरातचा संघ आमि पहिलावहिला विजेता (Rajasthan royals) राजस्थान यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) गुजरात की संजू सॅमसनचा (Sanju samson) राजस्थानचा संघ विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Hardik pandya and sanju samson
IPL 2022 Final : आयपीएलमध्ये पडणार पैशांचा पाऊस, 'या' संघांना मिळणार कोट्यावधी रुपये

दोन्ही संघांमध्ये स्टार खेळाडूंची फौज

गुजरात टायटन्सने आपला अंतिम सामना क्वालिफायर १ राजस्थान रॉयल्सच्या विरोधात खेळला होता. त्या सामन्यात गुजरातने सात विकेट्सने विजय मिळवला होता. राजस्थान आणि गुजरात मध्ये यंदाच्या हंगामात आतपर्यंत दोन सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातने दमदार विजय मिळवल्याने त्यांचं पारड जड आहे. दुसरीकडे राजस्थानचा संघही अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या आयपीएलच्या फायनल मध्ये राजस्थान-गुजरातची चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. राजस्थानची मदार जॉस बटलर, संजू सॅमसन, रविचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट यांच्यावर असणार आहे. त्याचसोबत यशस्वी जयस्वाल आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासारखे खेळाडूही राजस्थानकडे आहे.

गुजरातला घरच्या मैदानाचा फायदा होणार

मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या मार्गदर्शनात खेळणाऱ्या गुजरात संघाकडेही अनुभवी खेळाडूंची फौज आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याचसोबत राहुल तेवतीया आणि डेविड मिलर यांनी फिनिशर म्हणून दमदार कामगिरी केलीय. याशिवाय राशिद खान, रिद्धीमान साह यांसारखे अनुभवी खेळाडूही गुजरातच्या टीम मध्ये आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये गुजरातला होम अॅडवान्टेज मिळण्याची शक्यता आहे.

Hardik pandya and sanju samson
IPL Final 2022 : आयपीएल फायनल कोण जिंकणार? 'हे' ५ खेळाडू ठरवणार

दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग इलेव्हन

गुजरात टायटन्स: रिद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतीया, राशिद खान,साई किशोर,लॉकी फर्ग्यूसन,यश दयाल,मोहम्मद शमी.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जायस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा,युजवेंद्र चहल,ओबेड मकॉय.

फॅंटेसी XI: रिद्धीमान साहा,जॉस बटलर, संजू सॅमसन (उप-कर्णधार), शुभमन गिल (कर्णधार), डेविड मिलर, शिमरॉन हेटमायर, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ट, राशिद खान,मोहम्मद शमी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com