IPL 2023 Points Table: RCB कडून दारुण पराभव झालेला राजस्थानचा संघ अजूनही करू शकतो प्लेऑफमध्ये प्रवेश! फक्त करावं लागेल हे काम

IPL 2023 Updated Points Table : दारुण पराभव होऊनही राजस्थान रॉयल्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे. काय आहे समीकरण? जाणून घ्या.
rr vs rcb points table
rr vs rcb points table saam tv

RR VS RCB, IPL Points Table: आयपीएल २०२३ स्पर्धेत आतापर्यंत ६१ सामने खेळले गेले आहेत. रविवारी आयपीएल स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडला. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळडूंनी जोरदार कामगिरी करत ११२ धावांनी विजय मिळवला.

घरच्याच मैदानावर दारुण पराभव होऊनही राजस्थान रॉयल्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे. काय आहे समीकरण? जाणून घ्या.

rr vs rcb points table
IPL 2023 Points Table: KKR विरुध्दच्या पराभवानंतर CSK बाहेर? तर या २ संघांची झाली चांदी; पाहा काय आहे प्लेऑफचं समीकरण

आयपीएल २०२३ स्पर्धेचा पॉईंट्स टेबल पाहिला तर, गुजरात टायटन्स संघ १२ सामन्यांपैकी ८ सामने जिंकून १६ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने १३ पैकी ७ सामने जिंकले आहेत.

यापैकी एक सामना हा पावसामुळे धुतला गेला होता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ १५ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

तर रोहित शर्माच्या नेतृत्वखाली खेळणारा मुंबई इंडियन्स संघ १२ पैकी ७ सामने जिंकून १४ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्स संघ १३ गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहे. (Latest sports updates)

rr vs rcb points table
WATCH- चेपॉकच्या मैदानावर रंगला धोनीचा फेअरवेल सामना? लवकरच IPL स्पर्धेला करणार राम राम - VIDEO

पॉईंट् टेबलमध्ये वर जाण्यासह काही संघ असे देखील आहेत जे लवकरच स्पर्धेतून बाहेर पडू शकतात. दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला आहे.

तर चेन्नईविरुध्द विजय मिळवलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे.

तर सनरायझर्स हैदराबाद संघाचे २ सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने जिंकले तरीदेखील सनरायझर्स हैदराबाद संघाचे १३ गुण होतील. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची शक्यता खूप कमी आहे.

rr vs rcb points table
RR VS RCB Match Result: बंगळुरूचा राजस्थानवर सर्वात मोठा विजय; प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी झेप,असे असेल समीकरण

पराभूत होऊनही राजस्थानला संधी..

राजस्थानचा साखळी फेरीतील अंतिम सामना पंजाब किंग्ज संघाविरुध्द रंगणार आहे. हा सामना निर्णायक सामना असणार आहे. कारण दिल्लीला पराभूत करणाऱ्या पंजाब किंग्ज संघाला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे.

दिल्लीविरुध्द झालेल्या विजयामुळे पंजाब किंग्ज संघ सध्या मजबूत स्तिथीत आहे. जर राजस्थानला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल. तर या राजस्थान संघाला कुठल्याही परिस्थतीत पंजाबला पराभूत करावं लागणार आहे.

rr vs rcb points table
IPL 2023 Points Table: गुजरातला मागे सोडत CSK करणार Playoff मध्ये प्रवेश?पाहा काय आहे समीकरण

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा राजस्थानवर एकतर्फी विजय..

तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी बाद १७१ धावा केल्या होत्या.

फाफ डू प्लेसिसने सर्वाधिकी ५५ तर ग्लेन मॅक्सवेलने ५४ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून शिमरॉन हेटमायरने ३५ धावा केल्या. उर्वरित एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. राजस्थान रॉयल्स संघाचा डाव अवघ्या ५९ धावांवर संपुष्टात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com