IPL 2022 Final : हार्दिक अभिनंदन! नव्या दमाचा गुजरात टायटन्स IPL चॅम्पियन; राजस्थान पराभूत

यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज रविवारी होत आहे.
Hardik pandya and sanju samson
Hardik pandya and sanju samsonsaam tv

अहमदाबाद: आयपीएलच्या अंतिम सामन्यात, गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजयासाठी १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवातही खराब झाली आणि त्यांनी दोन विकेट लगेच गमावल्या. पण दुसरा सलामीवीर शुभमन गिल (नाबाद ४५) याने संघाची कमान संभाळली, तर कर्णधार हार्दिक पंड्या चांगलेच योगदान दिले. डेव्हिड मिलने (३२ धावा) देखील १८.१ षटकात ७ गडी आणि ११ चेंडू राखून चांगली फलंदाजी करत गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले.

अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वाचा (IPL 2022 Final) अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज रविवारी झाला. नव्यानं पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्सची (Gujrat Titans) लढत राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals)विरोधात झाली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातच्या समोर तगडं आव्हान ठेवण्यासाठी राजस्थानच्या फलंदाजांनी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, गुजरातच्या भेदक गोलंदाजीमुळं राजस्थनचा संघ २० षटकांमध्ये ९ बाद १३० धावाच करु शकला.

Hardik pandya and sanju samson
सिक्कीमला गेलेल्या पाच ठाणेकरांचा दुर्देवी मृत्यू, नेपाळमध्ये चार जण बेपत्ता

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये आयपीएल २०२२ च्या फायनलच्या थरारक सामन्याला सुरुवात झालीय. त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानच्या फंलंदाजांना गुजरातच्या गोलंदाजांनी धावांसाठी अक्षरश: तरसवलं. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने १६ चेंडूत २२ धावा केल्या. परंतु यश दयालच्या गोलंदाजीवर जयस्वाल झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर कमालीचा फॉर्मात असणाऱ्या जॉस बटलरला गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने ३९ धावांवर बाद केलं.

तसंच राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनही अवघ्या १४ धावाच करुन तंबूत परतला. संजूही हार्दिकच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या सर्व फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. दरम्यान, हार्दिकने राजस्थानच्या तीन फंलंदाजांना बाद करुन प्रभावी गोलंदाजी केली. तर साई किशोरने २, राशिद खान ,यश दयाल आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com