Ramdas Athawale News: क्रिकेटप्रेमी आठवले! लंडनमध्ये पाहिला ENG-NZ सामना; पण ट्वीटमध्ये केली मोठी चूक

Ramdas Athawale Watched ENG vs NZ Match: रामदास आठवले यांनी इंग्लंड- न्यूझीलंड सामना पाहिला. मात्र त्यांनी ट्विटमध्ये मोठी चुक केली आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleTwitter

Ramdas Athawale Tweet After ENG vs NZ Match:

वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये ४ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे.या मालिकेतील तिसरा वनडे सामना लंडनच्या ओव्हलमध्ये पार पडला. या सामन्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील हजेरी लावली होती. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ramdas Athawale
ENG vs NZ: बेन स्टोक्स काय खेळलाय! किवी गोलंदाजांची धुलाई करत मोडला मोठा रेकॉर्ड

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पार पडली. या लढतीत,इंग्लंडने बाजी मारली आणि १८१ धावांनी विजय मिळवला. ओव्हलच्या मैदानावर पार पडलेला हा सामना पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. रामदास आठवले हे उत्तम कविता करतात हे जगजाहीर आहे. मात्र ते क्रिकेटप्रेमी देखील आहेत हे खुप कमी लोकांना माहीत आहे.

रामदास आठवले यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. ज्यात ते ऐतिहासिक ओव्हलच्या मैदानावर सुरू असलेल्या रोमांचक सामन्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

या फोटोला कॅप्शन देत त्यांनी, सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वकप स्पर्धेतील इंग्लंड न्यूझीलंडचा आजचा एकदिवसीय क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद लंडन च्या ऐतिहासिक ओव्हल मैदानावर उपस्थित राहून घेतला.यावेळी माझा पुत्र कुमार जीत आठवले उपस्थित होते. तसेच क्रिकेट विश्वातील महेंद्रसिंग जडेजा ( दादा) उपस्थित होते.' असं लिहिलं आहे. वर्ल्डकप स्पर्धा येत्या ५ ऑक्टोबरपासून भारतात रंगणार आहे. मात्र त्यांनी आपल्या ट्विटमध्ये वर्ल्डकपचा सामना पाहतोय असा उल्लेख केला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ओव्हलच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मलानने ९६ तर बेन स्टोक्सने १८२ धावांची खेळी केली. (Latest sports updates)

तर कर्णधार जोस बटलर ३८ धावा करत माघारी परतला. इंग्लंडचा डाव ३६८ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून एकट्या ग्लेन फिलिप्सने ७२ धावांची खेळी केली. दुसऱ्या कुठल्याही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. न्यूझीलंडचा डाव १८७ धावांवर संपुष्टात आला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com