Ranji Trophy 2022 : मुंबईला धक्का; रणजी करंडक स्पर्धेत मध्य प्रदेश इतिहास रचणार?

चौथ्या दिवसाच्या अखेरपर्यंत सामन्याचं पारड मध्य प्रदेशच्या दिशेने झुकलं होतं.
Mumbai, Madhya Pradesh, Ranji Trophy 2022
Mumbai, Madhya Pradesh, Ranji Trophy 2022Saam Tv

बंगळुरु : चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी करंडक क्रिकेट (Ranji Trophy) स्पर्धेत यंदा पहिल्यांद मध्य प्रदेशचा (madhya pradesh) संघ विजय मिळविणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांच्यासह क्रीडाप्रेमींत कमालीचे आनंदी वातावरण आहे. रणजी करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात मध्य प्रदेश विरुद्ध पहिल्या डावात 162 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर मुंबईचा (mumbai) संघ दुसऱ्या डावात केवळ 269 धावाच करू शकला आहे. आता मध्य प्रदेशपुढे रणजी करंडकावर माेहाेर उमटविण्यासाठी 108 धावा करण्याचे आव्हान आहे. (Ranji Trophy 2022 Latest Marathi News)

पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच मुंबई संघाने आठ गडी गमावले. चौथ्या दिवशी दमदार फलंदाजी करणाऱ्या अरमान जाफरला स्वतःची धावसंख्या फारशी वाढवता आली नाही. त्याने 40 चेंडूत 37 धावा केल्या. यानंतर फॉर्ममध्ये असलेल्या सर्फराजने तीन चौकार आणि एका षटकार ठाेकत 45 धावांची खेळी केली. मात्र, तो बाद होताच मुंबईचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. दरम्यान, यशस्वी जैस्वाल 01, शम्स मुलाणी 17, तनुष कोटियन 11 आणि तुषार देशपांडे 07 धावांवर बाद झाले. सुवेद पारकरने 51 धावा करीत उत्तम खेळ केला.

Mumbai, Madhya Pradesh, Ranji Trophy 2022
Ranji Trophy Final : शाॅ, जयस्वाल जाेडीने केली मुंबईची धमाकेदार सुरुवात; मध्यप्रदेशचे गाेलंदाज ढेपाळले

मध्य प्रदेशकडून दुसऱ्या डावात कुमार कार्तिकेयने ९८ धावांत चार बळी घेतले. त्याचवेळी गौरव यादव आणि पार्थ साहनी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. इतिहास रचण्यासाठी मध्य प्रदेशच्या संघास 108 धावा करायच्या आहेत.

दरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी शनिवारी यंदा आमच्या खेळाडूंनी उत्तम खेळ केला आहे. आमचा संघ रणजी करंडक स्पर्धेत विजेतेपद पटकाविणार असा विश्वास माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

Mumbai, Madhya Pradesh, Ranji Trophy 2022
रत्नागिरीत पावसाचा धुमाकुळ; प्रशासन सतर्क, मच्छीमारांना सावधनतेचा इशारा
Mumbai, Madhya Pradesh, Ranji Trophy 2022
सात दिवसांसाठी 70 खोल्या बुक; खाण्यापिण्यासह एकनाथ शिंदेंचा दररोज हाेताेय इतका खर्च
Mumbai, Madhya Pradesh, Ranji Trophy 2022
आठशे पदांची हाेणार भरती; जाणून घ्या एमपीएससी पूर्व परीक्षा रचनेत झालेला महत्‍वपूर्ण बदल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com