IND vs PAK: सामन्यात कोणते गोलंदाज खेळणार? रवी शास्त्रींनी दिले उत्तर

भारताने सोमवारी सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. आता 20 ऑक्टोबरला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.
IND vs PAK: सामन्यात कोणते गोलंदाज खेळतील? रवी शास्त्रींनी दिले उत्तर
IND vs PAK: सामन्यात कोणते गोलंदाज खेळतील? रवी शास्त्रींनी दिले उत्तर Twitter

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shashtri) यांनी सोमवारी (18 ऑक्टोबर) टी -20 विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेत भारताच्या गोलंदाजी आक्रमणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, संघ पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला अतिरिक्त वेगवान गोलंदाज किंवा फिरकीपटूसह खेळणार आहे, हे परिस्थिती बघून ठरवले जाईल. सराव सामन्यांच्या दरम्यान गोलंदाजांची चाचणी घेऊ, असेही शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे. भारताने सोमवारी सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. आता 20 ऑक्टोबरला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.

शास्त्रींनी भारताचे माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ता यांच्याशी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “खेळपट्टीवर किती ड्यू आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानुसार प्रथम फलंदाजी/गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ. अतिरिक्त फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाजांबाबत निर्णय घेण्यास आम्हाला फायदा होईल''.

IND vs PAK: सामन्यात कोणते गोलंदाज खेळतील? रवी शास्त्रींनी दिले उत्तर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रथमच मध्य रेल्वेचे “रेस्टॉरंट ऑन व्हील्स”

शास्त्री म्हणाले की, आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंना तयारीमध्ये खूप मदत झाली आहे. विशेषतः ते खेळाडू जे नियमितपणे आपापल्या संघांसाठी खेळतात. शास्त्री म्हणाले, खेळाडू गेल्या दोन महिन्यांपासून आयपीएल खेळत आहेत, त्यामुळे त्यांना जास्त तयारीची गरज आहे असे मला वाटत नाही.

सराव सामन्यांच्या फायद्यांविषयी विचारले असता शास्त्री म्हणाले, "प्रत्येकजण कशी फलंदाजी करु शकतो, कशी गोलंदाजी करू शकतो. याची कल्पना येण्यास आम्हाला मदत होईल". केएल राहुल आणि इशान किशन यांनी आकर्षक अर्धशतके झळकावत संघाला सोमवारी टी -२० विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडवर सात गडी राखून विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर इंग्लंडने पाच बाद 188 धावा केल्या, जॉनी बेअरस्टो (36 चेंडूत 49) आणि मोईन अली (20 चेंडूत नाबाद 43) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने 40 धावा देऊन तीन बळी घेतले.

राहुलने 24 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या, तर इशानने 46 चेंडूत 70 धावा केल्या ज्यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 50 चेंडूत 82 धावा जोडल्या. शेवटी, ऋषभ पंत (14 चेंडूत नाबाद 29) आणि हार्दिक पांड्या (10 चेंडूत नाबाद 16) यांनी संघाची धावसंख्या 19 षटकांत 3 बाद 192 वर नेली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com