Ravindra Jadeja Update| रवींद्र जडेजा CSK सोडणार? नेमका काय झाला होता वाद?

रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सध्या कोणताही संपर्क नाही असं बोललं जातंय.
Ravindra Jadeja Chennai Super Kings  MS Dhoni IPL Cricket News Update
Ravindra Jadeja Chennai Super Kings MS Dhoni IPL Cricket News Update SAAM TV

IPL, CSK and Ravindra Jadeja मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा काही दिवसांनी पुन्हा आशिया चषक स्पर्धेत खेळताना दिसेल. मात्र, आयपीएलमध्ये सध्या चेन्नई सुपरकिंग्जसोबत त्याचं बिनसलं आहे. आयपीएल २०२२ नंतर हा वाद सुरू झाला आहे. आता तर हा वाद इतका टोकाला गेला आहे की रवींद्र जडेजा सध्या CSK या संघाच्या संपर्कातही नाही, असं सांगितलं जात आहे.

टीम इंडिया (Team India) सध्या झिम्बाब्वेमध्ये आहे. १८ ऑगस्टपासून भारत आणि झिम्बाब्वे (Ind vs Zim) या दोन संघांमध्ये वनडे मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर आशिया चषक स्पर्धा होणार आहे. (Asia Cup 2022 Schedule) मात्र, यात आयपीएल स्पर्धा पुन्हा चर्चेत आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि टीम इंडियातील स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आता पुढच्या स्पर्धेत नव्या संघाकडून खेळताना दिसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ravindra Jadeja Chennai Super Kings  MS Dhoni IPL Cricket News Update
MS Dhoni IPL 2023: पुढची आयपीएल खेळणार की नाही?; महेंद्रसिंह धोनीचा खुलासा

रिपोर्टनुसार, आयपीएल २०२२ स्पर्धा संपल्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या व्यवस्थापनामध्ये कोणताही संपर्क नाही. त्यामुळे रवींद्र जडेजा आयपीएल २०२३ पासून नवा मार्ग निवडण्याची शक्यता आहे.

Ravindra Jadeja Chennai Super Kings  MS Dhoni IPL Cricket News Update
क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा संपली, जाणून घ्या IND vs PAK सामन्याची तिकिटे कधी मिळणार?

आयपीएल २०२२ मध्ये रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एक वाद झाला होता. सुरुवातीला रवींद्र जडेजाला कर्णधार करण्यात आलं. मात्र, कामगिरी चांगली झाली नाही म्हणून त्याला मध्यांतरालाच हटवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडे नेतृत्व सोपवण्यात आलं.

रिपोर्टनुसार, रवींद्र जडेजा हा याच कारणामुळं नाराज होता. त्यानंतर तो एक-दोन सामने खेळला आणि जायबंदी झाल्यामुळं तो संघाबाहेर गेला. आता पुन्हा रवींद्र जडेजा आणि CSK या संघात बिनसल्याचे बोलले जात आहे.

रवींद्र जडेजा याने आयपीएल २०२२ नंतर चेन्नई सुपरकिंग्जशी संबंधित सर्व पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. चेन्नई सुपरकिंग्जने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर रवींद्र जडेजासंबंधी अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. मात्र, त्याने कोणताही रिप्लाय दिला नाही. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनी २०२३ मधील स्पर्धाही खेळणार असल्याचं त्याने स्वतः स्पष्ट केलेले आहे. याचाच अर्थ तोच संघाचं नेतृत्व करेल. अशावेळी रवींद्र जडेजाची कर्णधार म्हणून संघात पुन्हा एन्ट्री होणे अशक्य आहे. तर तो अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com