IPL 2022: रविंद्र जाडेजानं कर्णधारपद सोडलं, नेतृत्व पुन्हा धोनीकडे; जाणून घ्या कारण

यंदाच्या मोसमात अपयशी ठरलेल्या चेन्नई संघाचं नेतृत्व पुन्हा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीकडं देण्यात आलं आहे.
IPL 2022: रविंद्र जाडेजानं कर्णधारपद सोडलं, नेतृत्व पुन्हा धोनीकडे; जाणून घ्या कारण
Chennai Super KingsSaam Tv

मुंबई: आयपीएलमध्ये (IPL 2022) मोठी घडामोड घडली आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजानं चेन्नई सुपरकिंग्जचे कर्णधारपद सोडलं आहे. यंदाच्या मोसमात अपयशी ठरलेल्या चेन्नई संघाचं नेतृत्व पुन्हा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीकडं देण्यात आलं आहे.

Chennai Super Kings
चेन्नई सुपर किंग्जने धोनीबाबत घेतला मोठा निर्णय

चेन्नई संघाला चार वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या धोनीनं या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीलाच कर्णधारपद सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यावेळी संघ व्यवस्थापनानं संघाचं नेतृत्व अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाकडे दिलं होतं. मात्र, कर्णधारपद मिळाल्यानंतर जाडेजा सुरुवातीपासून दबावात खेळत असल्याचं दिसून आलं. परिणामी त्याच्या नेतृत्वाची चुणूक दिसून आली नाही. याशिवाय फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. आपल्या फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठीच त्यानं कर्णधारपद सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.