Australia Tour: रोहित शर्मा, विराट कोहलीला विश्रांती; जडेजाचं प्रमोशन करण्यामागं BCCI चा काय आहे प्लान?

vice captain Jadeja: रविंद्र जडेजाला या सामन्यांसाठी उपकर्णधार करण्यात आलंय. निवड समितीच्या या निर्णयानं अनेकांना धक्का बसला.
Ravindra Jadeja
Ravindra Jadejasaam Tv

Ravindra Jadeja vice-captain :

आशिया चषक जिंकल्यानंतर जोशात असलेला भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियालाशी दोन हात करणार आहे. आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामने होणार आहेत. दरम्यान भारतीय संघानं आशिया चषक जिंकल्यानं टीम इंडिया पूर्ण जोशात आहे. (Latest Sport News)

तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला ३-२ ने पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेतून दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असेल. याच दरम्यान टीम इंडियाच्या संघ निवड समितीनं भारतीय क्रिकेट संघात मोठा बदल केलाय. रविंद्र जडेजाला या सामन्यांसाठी उपकर्णधार करण्यात आलंय. निवड समितीच्या या निर्णयानं अनेकांना धक्का बसला.

के एल राहुललाने अनेकवेळा कर्णधारपदाची जबाबदारी संभाळलीय. तर जडेजानं कसोटी आणि देशांतर्गत झालेल्या सामन्यात उपकर्णधाराची जबाबदारी संभाळलीय. यात त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. २००८ साली झालेल्या अंडर १९च्या विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचं उपकर्णधार पद जडेजानं संभाळलं होतं.

रविंद्र जाडेजाची ऐतिहासिक कामगिरी

टीम इंडियाच्या चपळ खेळाडूमध्ये रविंद्र जडेजाचं नाव घेतलं जातं. नुकत्याच झालेल्या आशिया चषकाच्या इतिहासात रविंद्र जडेजानं एकूण १८ सामन्यांच्या १७ डावांमध्ये २४ विकेट घेतल्या. यादरम्यान त्याची सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरी म्हणजे २९ धावा देत ४ विकेट घेण्याचा आहे. दरम्यान आशिया चषकाच्या एकदिवशीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत जडेजा पाचवा नंबरचा खेळाडू आहे.

या यादीत पहिला स्थानी श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आहे. तर आशिया चषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये पहिला बनला आहे. जडेजानं इरफान पठानचा सर्वोधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड मोडलाय. या मार्च महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात रविद्र जडेजानं उपकर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली होती.

या कसोटी सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा टप्पा गाठला होता. भारताचा माजी कर्णधार कपिल देवनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स आणि ५ हजार धावा पूर्ण करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत त्याने सात विकेट्स घेतल्या होत्या. तर, दिल्ली कसोटीत १० विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला होता. तर रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना जडेजानं सौराष्ट्र संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी संभाळली होती. जडेजाच्या कारकिर्दीतील पहिली मोठी कामगिरी रणजी ट्रॉफीमध्ये झाली. यात त्याने एका वर्षात तीन त्रिशतके झळकावली होती. जडेजाने पहिल्यांदा नोव्हेंबर २०११ मध्ये आणि पुन्हा नोव्हेंबर २०१२ आणि डिसेंबर २०१२ मध्ये सलग दोन त्रिशतके झळकावली.

अशाप्रकारे रणजी ट्रॉफीमध्ये तीन त्रिशतके करणारा तो पहिला आणि आजपर्यंतचा एकमेव फलंदाज ठरलाय. या कामगिरीचं बक्षीसही त्याला मिळालं आणि डिसेंबर २०१२ मध्येच त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. रवींद्र जडेजा 2013 मध्ये नंबर वन वनडे गोलंदाज बनला होता. अनिल कुंबळेनंतर 1996 मध्ये पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजाला प्रथम क्रमांक मिळाला होता. काही काळानंतर तो कसोटीतील नंबर वन गोलंदाज आणि नंबर वन अष्टपैलू खेळाडूही बनला.

काय आहे प्लान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवशीय मालिकेसाठी केएल राहुलच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर रविंद्र जडेजाचं प्रमोशन करण्यात आलंय. या निर्णयामुळे बीसीसीआय विश्वकप आधी टीम इंडियाच्या संघात प्रयोग करत आहे. प्रत्येक प्रभावशाली खेळाडूंवर महत्त्वाची जबाबदारी देऊन त्यांची कामगिरी कशी होते हे पाहतेय. बीसीसीआयनं टीम इंडियातील गोलंदाजांना कर्णधारपदाची जबाबदारी देत त्यांची कामगिरी सुधारण्याचा प्रयोग सुरू केलाय.

गोलंदाजांना फलंदाजांच्या मानसिकतेचा अंदाज येत असतो. तसेच क्षेत्ररक्षण लावण्यात त्याला कोणतीच समस्या जाणवत नसते. कपिल देव यांनी त्यांच्या कारकीर्दीत १९८६ मध्ये विश्वकप जिंकला होता. बीसीसीआय सध्या तसेच गोलंदाज- कम-कर्णधार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी हार्दिक पांड्याला कर्णधार पद घेत त्यांच्या नेतृत्वात काही मालिका बीसीसीआयनं खेळवल्या. त्यात हार्दिकनं सरस भूमिका पार पाडली. त्यानंतर भारताचा भेदक गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कर्णधार बनवलं होतं. त्याच्या नेतृत्त्वात आर्यलँडविरुद्धात मालिका खेळवण्यात आली होती.

आता रविंद्र जडेजावर महत्त्वाची जबाबदारी दिली जात आहे. बीसीसीआय रोहित शर्मानंतर हार्दिक, एल राहुल, याचा पर्याय शोधत आहे. या खेळाडूंच्या तोडीची कामगिरी करणारा गोलंदाज जो कर्णधार पदाची जबाबदारी योग्य पद्धतीनं संभाळेल, असा पर्याय शोधला जात आहे.

Ravindra Jadeja
IND vs AUS, Schedule: आशिया चषकानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूद्ध करणार दोन हात; पाहा मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com