CSK ला आणखी एक झटका; IPL च्या उर्वरीत सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा नसणार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जडेजाला दुखापत झाली होती.
CSK ला आणखी एक झटका; IPL च्या उर्वरीत सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा नसणार
Ravindra Jadejasaam TV

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आता आयपीलच्या उर्वरीत सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं CSK टीमचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितलं आहे. रवींद्र जडेजाच्या बरगडीला दुखापत झाल्यामुळे तो आयपीएल 2022 चे उर्वरीत सामने खेळू शकणार नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जडेजाला शरीराच्या वरच्या भागाला दुखापत झाली होती. दुखापतीमुळं या सामन्यात सीएसकेला पराभवचा सामना करायला लागला. दरम्यान, जडेजाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना देखील खेळता आला नव्हता. शिवाय तेव्हापासून रवींद्र जडेजाला IPL 2022 मधून बाहेर पडावं लागू शकतं, अशा चर्चा सुरु झाल्या होते आणि अखेर काल बुधवारी रात्री चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन (Kashi Viswanathan) यांनी अधिकृतपणे जडेजा आता आयपीएलमधून बाहेर पडल्याचं सांगितलं आहे.

आयपीएल 2022 मध्ये रवींद्र जडेजा दमदार फॉर्मसह प्रवेश करणार होता. यामुळे त्याला CSK चे कप्तानपद मिळाले होते, पण त्याची कामगिरी आणि संघाची कामगिरी खराब होती. अशा परिस्थितीत त्याने मध्येच कर्णधारपद पुन्हा धोनीकडे सोपवलं होतं. त्यानंतर मागील सामन्यात जडेजा संघातही नव्हता आणि आता तो उर्वरीत आयपीएलला मुकणार असल्याचंही समोर आलं आहे. मात्र, चेन्नई संघाला (Chennai Super Kings) या दुखापतीमुळे यंदा बरच नुकसान सहन करावं लागलं आहे. याआधी मुख्य गोलंदाज दीपक चहरही दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.