हार्दिक पांड्या आणि विराट कोहली आमने-सामने; 'अशी' असेल गुजरात-बंगळुरुची प्लेईंग ११

हार्दिक पांड्या आणि विराट कोहली आमने-सामने; 'अशी' असेल गुजरात-बंगळुरुची प्लेईंग ११
virat kohli and hardik pandyagoogle

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या मोसमात (IPl 2022) नव्यानं समावेश झालेल्या आणि गुणतालिकेत अव्वल स्थानावर असणाऱ्या गुजरात टायटन्सच्या (Gujrat Titans) समोर रॉयल चॅंलेंजर्स बॅंगलोरचं (RCB) आव्हान असणार आहे. शनिवारच्या डबल हेडरमध्ये पहिला सामना गुजरात आणि बंगळुरुत रंगणार आहे. मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियमवर आज दुपारी ३.३० वाजता आरसीबी आणि गुजरातमध्ये लढत होणार आहे. गुजरात संघाचं नेतृत्व करणाऱ्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik pandya) संघाला ७ सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. हार्दिकनेही यंदाच्या आयपीएलमध्ये धमक दाखवून दिलीय. तर दुसरीकडे आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) धावांसाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे आज मुंबईत हार्दिक-विराट अशी जोरदार लढत होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत सूर न गवसलेल्या विराटच्या बॅटमधून आजच्या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी होते का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

virat kohli and hardik pandya
Rohit Sharma: रोहित शर्माशी संबंधित 10 मोठे खुलासे अन् रेकॉर्ड

गुजरात टायटन्स जिंकली, तर प्ले ऑफमध्ये जागा पक्की

यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाने चमकदार कामगिरी केलीय. आतापर्यंत सात सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे आज बंगळुरु विरोधात होणाऱ्या सामन्यात गुजरातने आठवा विजय मिळवला तर प्ले ऑफ मध्ये गुजरात टायटन्सची एन्ट्री होईल. १४ गुण मिळवलेल्या गुजरातला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी आणखी २ गुणांची आवश्यकता आहे. तर सलग दोनवेळा पराभव झालेल्या आरसीबीला हॅट्रीकपासून बचाव करण्यासाठी गुजरातचा पराभव करावा लागेल. त्यामुळे आज होणाऱ्या गुजरात आणि आरसीबीच्या सामन्यात विराट-हार्दिक काय रणनीती आखतात, हे पाहावं लागेल.

दोन्ही संघांचं संभाव्य प्लेईंग ११

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लोकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि यश दयाल

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई/महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवुड.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.