
Virat Kohli Emotional : आयपीएलच्या ७०व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेन्जर्स बँगलोरचा ६ विकेट्सने पराभव केला. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यावर सर्वच क्रिकेट फॅन्सचं लक्ष होतं. कारण या सामन्यानंतर प्लेऑफमध्ये मुंबई की बँगलोर पोहचणार याचं उत्तर मिळणार होतं.
मात्र बँगलोरच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या मनसुब्यांवर शुभमन गिलनं शतक ठोकत पाणी फेरलं. बँगलोरने सामना गमावल्यानंतर विराट काहीसा भावुक झाला, त्याचे डोळेही पाणावले.
विराट कोहलीनं यंदाचं आयपीएलही गाजवलं. मागील आयपीएलमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या विराटनं यंदाच्या आयपीएलमध्ये सलग दोन शतक ठोकत आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली. मागील १५ सीजनपासून आयपीएल खेळणाऱ्या विराट कोहलीचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अपूर्णच आहे.
यंदा तरी विराटची ही इच्छा पूर्ण होईल, असं त्याच्या फॅन्सना वाटत होतं. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी विराट खेळलाही तसाच. मागील सामन्यात शतक आणि आजच्या सामन्यातील शतकाच्या जोरावर विराटने आरसीबीला प्ले ऑफच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवलं होतं. सामन्यात जीव ओतून खेळणाऱ्या विराटची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची धडपड दिसत होती. मात्र एवढी मेहनत करुनही विराटच्या नशिबी वाट बघनंच आलं आहे. (Latest sports updates)
शेवटच्या काही षटकांमध्ये सामना हातातून निसटताना बघून विराटची मनाची अवस्था चेहऱ्यावर दिसून येत होती. मात्र त्यांच्या मनातील भिती खरी ठरली अन् आरसीबीने महत्त्वाचा सामना गमावला. तसेच प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधीही गमावली. यावेळी विराट काहीसा भावुक झालेला दिसला, त्याचे डोळेही पाणावले. आपल्या टोपीच्या साहायाने आपल्या चेहऱ्यावरील दु:ख लपवण्याचा प्रयत्न केला.
गुजरातचा दणदणीत विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ गडी बाद १९७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला आहे. बँगलोरकडून विराटहे १०१ धावांची खेळी केली, तर शुभमन गिलने गुजरातकडून १०२ धावांची नाबाद खेळी केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.