RCB VS GT Weather Update: महत्वाच्या सामन्यापूर्वीच विराट सेनेला मोठा धक्का! तर मुंबईला दिलासा देणारी बातमी आली समोर

Bangalore Weather Today: या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
bangalore weather update
bangalore weather updatesaam tv

RCB VS GT IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज सुपर संडे सामने पार पडणार आहेत. डबल हेडरचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे.

हा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. मात्र या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

bangalore weather update
Rinku Singh In Team India: रिंकू भावा जिंकलस; IPL मधून बाहेर पण टीम इंडियात वाट बघतोय आम्ही!!

कसं असेल आजचं वातावरण?

ज्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मैदानात येईल त्यावेळी त्यांना चांगलच माहीत असेल की, या सामन्यात नेमकं काय करायचं आहे. कारण मुंबईचा सामना झाला असेल. मात्र पाऊस या सामन्यात अडथळा निर्माण करू शकतो.

जर पहील्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला केवळ विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. मात्र विजय मिळवल्यास नेट रन रेटच्या साहाय्याने संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे.

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज बंगळुरूत पाऊस पडण्याची शक्यता ६५ टक्के इतकी आहे. सामना सुरु असताना पाऊस सुरु राहील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. (Latest sports updates)

bangalore weather update
LSG vs KKR IPL Match: निकोलस पूरन अर्धशतकी खेळीने चमकला; लखनौचं कोलकाताला १७७ धावांचं आव्हान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अजुनही आपल्या पहील्या ट्रॉफीच्या शोधात आहे. या संघाकडे प्लेऑफमध्ये जाण्याची संधी चालुन आली आहे. मात्र आता पावसामुळे हा सामना धुतला जाऊ शकतो.

जर पहील्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ कमी धावांनी पराभुत झाला तरी देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. यासाठी ते कमी धावांनी पराभुत होणं गरजेचं आहे.

bangalore weather update
IPL 2023 Playoffs Race: मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकच मार्ग शिल्लक! रोहित सेनेला करावं लागेल हे काम

अशी असु शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार) , ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरर, अनुज रावत (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, हर्षल पटेल, वेन पारनेल, शाहबाज अहमद, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज

गुजरात टायटन्स:

शुभमन गिल, ऋद्धिमान साहा(विकेटकीपर), साई सुधारसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, यश दयाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com