
GT VS MI, IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेतील क्वालिफायरचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ६२ धावांनी विजय मिळवला.
यासह आयपीएल २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. काय आहेत मुंबईच्या पराभवाची कारणे? जाणून घ्या.
शुभमन गिलचा झेल..
नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाला शुभमन गिलने चांगली सुरुवात करून दिली. त्याने या डावात ६० चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १२९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने ३ गडी बाद २३३ धावांचा डोंगर उभारला.
मात्र तो जेव्हा ३० धावांवर फलंदाजी करत होता, त्यावेळी टीम डेविडने त्याचा झेल सोडला. तो झेल तर टिपला गेला असता तर गुजरातला इतकी मोठी धावसंख्या उभारता आली नसती.
गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी..
गेल्या सामन्यात चमकलेले मुंबईचे गोलंदाज या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. गेल्या सामन्यातील सुपरहिट गोलंदाज आकाश मधवाल या सामन्यात दुसरा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. ४ षटकात त्याने ५२ धावा खर्च केल्या आहेत.
यादरम्यान त्याला केवळ १ गडी बाद करता आला. तर ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ५६ धावा खर्च केल्या. अनुभवी फिरकी गोलंदाज पियूष चावलाने ४५ धावा खर्च केल्या. मुंबईचे गोलंदाज विकेट्स घेण्यात अपयशी ठरले. (Latest sports updates)
पावरप्लेमध्ये मुंबईला बसले धक्के..
मुंबईचा आक्रमक सलामीवीर फलंदाज ईशान किशन या डावात फलंदाजी करण्यासाठी येऊ शकला नव्हता. मुंबईची गोलंदाजी सुरू असताना तो दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. ईशान किशनच्या अनुपस्थितीत मुंबईला हवी तशी सुरुवात करता आली नाही.
नेहाल वढेरा ४ तर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. २३४ धावांचा पाठलाग करताना मुंबईला चांगल्या सुरुवातीची गरज होती. मात्र ते होऊ शकलं नाही. कॅमेरून ग्रीनच्या हाताला देखील बॉल लागला होता. मात्र तो फलंदाजीला आला होता. त्याने या डावात ३० धावांची खेळी केली.
सूर्याची विकेट..
मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली.
या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. सूर्यकुमार यादव ज्यावेळी फलंदाजी करत होता. त्यावेळी असे वाटत होते की, मुंबई इंडियन्स संघ हा सामना जिंकू शकतो. मात्र तो बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.