Kabbadi : रक्ताच्या थारोळ्यात नागरिकांनी पाहिलं कबड्डीपटूस; खून प्रकरणी एकास अटक

वैद्यकीय अधिका-यांनी त्यास मयत घाेषित केले.
Dharavi, Kabbadi,  Vimal Raj Nadar , Mumbai News
Dharavi, Kabbadi, Vimal Raj Nadar , Mumbai NewsSaam Tv

मुंबई : कबड्डी (kabbadi) खेळातून स्वत:चा नावलाैकिक वाढविलेल्या विमल राज नाडार (Vimal Raj Nadar) याचा धारावीत (dharavi) खून झाला. शनिवाी पहाटे ही घटना घडली असून या प्रकरणी पाेलिसांना एकास अटक (arrest) केली आहे. (Dharavi Latest Marathi News)

विमल राज हा धारावीतील कामराज चाळी येथे वास्तव्यास हाेता. मालेश चिताकांडी (Malesh Chitakandi) यास पाेलिसांनी विमल राज याच्या खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. मालेश हा विमल राजच्या शेजारीच राहत हाेता.

Dharavi, Kabbadi,  Vimal Raj Nadar , Mumbai News
Sangli : सांगलीत एक दिवसाच्या बाळाचं झालं अपहरण; पाेलिस तपास सुरु

शनिवारी रात्री मालेश मित्रासमवेत विमल राजच्या घराबाहेर बाेलत हाेते. त्यांचा बाेलण्याचा आवाज माेठ मोठ्याने येत हाेता. त्यामुळे विमल राजला झोप लागत नव्हती. त्यातून वाद निर्माण झाला. त्यातूनच विमल राज याचा खून झाला.

Dharavi, Kabbadi,  Vimal Raj Nadar , Mumbai News
मुंबईत कारचा भीषण अपघात! कारचे झाले दोन तुकडे; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर म्हणाले मालेश हा त्याच्या मित्रासमवेत विमल राजच्या घराबाहेर बाेलत बसले होते. त्यांच्या बाेलण्यानं विमल राजची झाेपेतून जागा झाला. त्याने दाेघांना हटकलं. त्यातून वाद झाला. तसेच मारामारी झाली. मालेश याने विमल राज याच्यावर स्टम्पनं हल्ला केला. विमल हा पहाटे पाच पर्यंत रक्ताच्या थाराेळ्यात जागेवर पडून हाेता. त्याला घराच्या परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात नेले. परंतु वैद्यकीय अधिका-यांनी त्यास मयत घाेषित केले.

Edited By : Siddharth Latkar

Dharavi, Kabbadi,  Vimal Raj Nadar , Mumbai News
Poladpur : धाेकादायक स्थितीमुळं घरे रिकामी करण्याचे निर्देश; ग्रामस्थांचा नकार, प्रशासन हतबल
Dharavi, Kabbadi,  Vimal Raj Nadar , Mumbai News
पत्नीच्या डोक्यात मारला हाताेडा; पतीस अटक
Dharavi, Kabbadi,  Vimal Raj Nadar , Mumbai News
Satara Breaking News : पाणी भरू न दिल्याने दाेन कुटुंबात राडा; तलवार, कुऱ्हाडीनं एकमेकांवर हल्ला

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com