
Rinku Singh In Team India: आयपीएल २०२३ स्पर्धेत आता रोमांचक वळणावर पोहोचली आहे. आतापर्यंत ३ संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर १ स्पॉटसाठी अजूनही ३ संघांमध्ये चुरस सुरू आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयापासून १ धाव दूर राहिला.
लखनऊने हा सामना जिंकत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि विजयाच्या मध्ये रिंकू सिंग मजबूत भिंती सारखा उभा होता.
आता सोशल मीडियावर, धोनीनंतर भारतीय संघाचा फिनिशर रिंकू सिंग असेल असं म्हटलं जाऊ लागलं आहे.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स पराभव जवळजवळ निश्चित होता. मात्र रिंकू सिंगने तुफानी खेळी करत शेवटच्या चेंडूपर्यंत किल्ला लढवला. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
मात्र रिंकू सिंग हा क्रिकेट फॅन्सच्या मनात घर करून बसला आहे. शेवटच्या षटकात वैभव अरोडाने पहिल्या चेंडूवर एक धाव काढत स्ट्राईक रिंकू सिंगला दिली. पुढचा चेंडू वाइड होता. पुढचे २ चेंडू निर्धाव राहिले. पुढचा चेंडू पुन्हा त्याने वाईड टाकला.
आता कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी ३ चेंडूंमध्ये १८ धावांची गरज होती. त्यावेळी यॉर्कर चेंडूवर रिंकूने षटकार मारला.
पुढचा चेंडू यशने वाईड यॉर्कर टाकला. ज्यावर रिंकूने चौकार मारला. अंतिम चेंडूवर कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी ८ धावांची गरज होती. जे जवळजवळ अशक्य होतं. मात्र तरीदेखील त्याने षटकार मारत सामना संपवला.
लवकरच टीम इंडियात संधी?
रिंकू सिंग हा भविष्यात फिनिशर म्हणून आपली ओळख निर्माण करू शकतो. एमएस धोनीनंतर भारतीय संघात असा एकही फलंदाज झाला नाही, जो शेवटच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडू शकतो.
मात्र रिंकू सिंगमध्ये ती क्षमता आहे. त्याने यापूर्वी देखील सलग ५ षटकार मारून सामना जिंकून दिला आहे. तसेच लखनऊ विरुध्द खेळताना देखील जवळजवळ सामना जिंकून दिला होता. आयपीएल २०२३ स्पर्धेत ४७४ धावा केल्या आहेत. ही कामगिरी पाहता त्याला लवकरच भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. (Latest sports updates)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, कोलकाता नाईट रायडर्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून निकोलस पुरनने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली.
तर क्विंटन डी कॉकने २८ धावांचे योगदान दिले. लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून रिंकू सिंगने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने ४५ धावांचे योगदान दिले. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयापासून केवळ १ धाव दूर राहिला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.