Robin Uthappa: रॉबिन उथप्पाचा विषये का! दोनदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच- VIDEO

पहिल्याच सामन्यात रॉबिन उथप्पा एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे
Robin uthappa
Robin uthappaTwitter

Legends Cricket League Robin uthappa catch: लेजेंड्स क्रिकेट लीग २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंडिया महाराजा आणि एशिया लायन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या स्पर्धेत इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी गौतम गंभीरला देण्यात आली आहे. तर एशिया लायन्स संघाचे नेतृत्व शाहिद आफ्रिदी करत आहे.

या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंचा आमना सामना होताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात रॉबिन उथप्पा एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. (Latest sports updates)

Robin uthappa
WPL 2023: WPL मध्ये मराठमोळ्या श्रेयांकाचा खणखणीत षटकार; उपस्थितांना आठवला एबी डिव्हिलियर्स

शाहिद आफ्रिदीच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज तिलकरत्ने दिलशान डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आला होता.

मात्र तो जास्तवेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. अशोक दिंडाने त्याला पॅव्हेलियनची वाट दाखवली. विकेट अशोक दिंडाने मिळवली मात्र चर्चा रॉबिन उथप्पाने टिपलेल्या झेलची झाली.

इंडिया महाराजा संघाची गोलंदाजी सुरु असताना दुसरे षटक टाकण्यासाठी अशोक दिंडा गोलंदाजी करण्यासाठी आला होता.

या षटकात त्याने दिलशानला हक्काबक्का करून सोडलं. दुसऱ्याच षटकात दिंडाने असा काही चेंडू टाकला, जो टप्पा पडताच बाहेरच्या दिशेने निघाला. दिलशानने ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला कारण चेंडू बॅटचा कडा घेत यष्टिरक्षण करत असलेल्या रॉबिन उथप्पाच्या हातात गेला.

Robin uthappa
IND VS AUS 4th test: पडला, धडपडला तरीही पठ्ठयाने चेंडू शोधून काढला; आजच्या दिवसातील फॅन मुमेंट नक्की पाहा - VIDEO

अशोक दिंडाने टाकलेल्या चेंडूची गती इतकी होती की, चेंडू बॅटला लागताच वेगाने निघाला. त्यावेळी यष्टिरक्षण करत असलेल्या रॉबिन उथप्पाने डाव्या बाजूला डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला.

पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात हा चेंडू सूटला मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्याने झेल टिपला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com