Rohit Sharma: रोहित शर्माशी संबंधित 10 मोठे खुलासे अन् रेकॉर्ड

रोहित शर्माच्या फलंदाजीचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत.
IPL 2022 Rohit Sharma
IPL 2022 Rohit SharmaSaam TV

क्रिकेटमध्ये हिटमॅन (Hitman) म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आज त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करतोय. रोहित शर्माच्या फलंदाजीचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तीन द्विशतके झळकावली आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्येही धमाकेदार सुरुवात केली आणि पहिल्या दोन डावात दोन शतके झळकावली. त्याच्या फलंदाजीबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज त्याच्या वाढदिवसानिमित्त (Rohit Sharma Birthday) आपण अशा गोष्टींबद्दल जाणून घेऊयात ज्या तुम्हाला माहिती नसतील.

* रोहित अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला आहे. त्याचे वडील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करत होते आणि आई गृहिणी होती. रोहितचे वडील गुरुनाथ शर्मा यांची एका ट्रान्सपोर्ट कंपनीतील नोकरी गेली तेव्हा कुटुंबाची जबाबदारी अगदी लहान वयातच रोहितच्या खांद्यावर आली. तो त्यावेळी इंडियन ऑईल आणि रणजी मॅच खेळत असे. त्याच्या इतर नातेवाईकांनी त्याला 1999 मध्ये क्रिकेट अकादमीत परत पाठवण्यासाठी काही पैसे दिले होते. (Unkown Facts of Rohit Sharma)

IPL 2022 Rohit Sharma
Raj Thackeray: राज ठाकरे पुण्यात, वसंत मोरे गैरहजर; साईनाथ बाबर म्हणाले...

* हिंदी, इंग्रजी आणि मराठी व्यतिरिक्त रोहित शर्माची तेलुगूवरही चांगली पकड आहे. कारण त्याची आजी आंध्र प्रदेशामधील आहे, त्यामुळे त्याला तेलुगू भाषा कशी लिहायची आणि बोलायची हे चांगलं माहित आहे.

* घरचं वातावरण शाकाहारी असूनही, रोहित शर्माला अंडी खायला आवडतात, असे म्हटले जाते. एकदा त्याने एका मित्राला ब्रेक न घेता 50 अंडी खाण्याचे आव्हान दिले.

* रोहित शर्माने त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात ऑफस्पिनर म्हणून केली होती, पण त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याची फलंदाजी क्षमता समजून घेत त्याला फलंदाजी करण्याचा सल्ला दिला, त्यानंतर रोहितनेही त्यांच्या सल्ल्यानुसार खेळण्यास सुरुवात केली.

* रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला. सय्यद मुश्ताक अली T-20 स्पर्धेच्या 2006-07 साली रोहित शर्माने गुजरात विरुद्ध मुंबईसाठी ही कामगिरी केली. त्याने 45 चेंडूत 13 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 101* धावा केल्या.

* रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 150+ धावा करणारा खेळाडू आहे. हा पराक्रम त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 6 वेळा केला आहे.

* आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 3-3 शतके झळकावणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज आहे.

* रोहित शर्मा फुटबॉलचा मोठा चाहता आहे आणि तो मँचेस्टर युनायटेडचा जबरदस्त चाहता आहे.

* रोहित शर्मा हा माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मोठा चाहता आहे. तो त्याचा इतका मोठा चाहता आहे की त्याच्या शालेय जीवनात तो एकदा वीरेंद्र सेहवागची फलंदाजी पाहण्यासाठी शाळेच्या बुडवून गेला होता.

* आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. रोहित सलग 11 वर्षे आयपीएलमधील एकाही सामन्यात अनुपस्थीत नव्हता.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com