MI vs GT Playing 11: सामन्याआधीच हार्दिकला फुटलाय घाम! आजच्या सामन्यात रोहित हुकमी एक्का काढणार बाहेर

Arjun Tendulkar: आज टेबल टॉपर गुजरातचा संघ चौथ्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आव्हान देणार आहे.
mumbai indians
mumbai indianssaam tv

MI VS GT IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. इथून पुढे सर्व सामने सर्व संघांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे. कारण एक चूक थेट आपल्या संघाला स्पर्धेतून बाहेर करू शकते. आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

रोज पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज टेबल टॉपर गुजरातचा संघ चौथ्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आव्हान देणार आहे.

mumbai indians
IPL 2023 Points Table: राजस्थानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर! मुंबईची चिंता वाढली, तर KKR थेट बाहेर

मुंबई इंडियन्स संघ हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मात्र हा संघ या हंगामात संघर्ष करताना दिसून येत आहे. तसं पाहायला गेलं तर मुंबई इंडियन्स संघाने ३ वेळेस २०० धावांचा डोंगर सर करत विजय मिळवला आहे. मात्र संघाचा कर्णधार रोहित शर्मा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय.

रोहितचा फॉर्म हा मुंबई इंडियन्स संघासाठी चिंतेचा विषय ठरतोय. तर दुसरीकडे मुंबईचे गोलंदाज धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरत आहेत. जर टेबल टॉपर गुजरातला या संघात पराभूत करायचं असेल तर मुंबईला मजबूत गोलंदाजी आक्रमणासह मैदानात उतरावं लागणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाकडून रोहितचा फॉर्म वगळला तर संघातील इतर फलंदाज चांगलीच कामगिरी करताना दिसून येत आहेत. रोहित शर्माला या संपूर्ण स्पर्धेत केवळ १ अर्धशतक झळकावता आले आहे.

तर दुसरीकडे ईशान किशन संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. ईशानला जर रोहितची साथ मिळाली तर दोघे मिळून विपक्षी संघातील गोलंदाजांची दाणादाण उडवू शकतात. तसेच संघातील मुख्य फलंदाज सूर्यकुमार यादव देखील फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाजी क्रम मजबूत झाला आहे. (Latest sports updates)

mumbai indians
IPL 2023 : रोहित शर्मासाठी 'करो या मरो'ची लढाई; मुंबई इंडियन्स मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

अर्जुनला संधी मिळणार?

जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत जेसन बेहरेनडॉर्फ हा मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करतोय. तो या संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करतोय. मात्र त्याला हवा तसा जोडीदार मिळत नाहीये. डाव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकर त्याला साथ देऊ शकतो. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी दिली जाऊ शकते.

अशी असू शकते मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग ११ :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), नेहाल वधेरा, तिलक वर्मा, कॅमरून ग्रीन,सूर्यकुमार यादव,टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, कुमार कार्तिकेय

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com