Vice Captain Of Team India: WTC फायनलसाठी रोहित शर्मा कर्णधार तर संघाचा उपकर्णधार कोण?

Team India News: भारतीय संघाचा उपकर्णधार कोण?असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर जाणून घ्या कोण असेल संघाचा उपकर्णधार.
team india
team india saam tv

IND VS AUS WTC Final 2023: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. ७ ते ११ जून दरम्यान हा सामना केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी ओव्हलचं मैदान सज्ज झालं आहे.

दोन्ही संघ देखील सामन्यासाठी जिंकण्यासाठी कसून मेहनत करताना दिसून येत आहेत. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

मात्र भारतीय संघाचा उपकर्णधार कोण?असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर जाणून घ्या कोण असेल संघाचा उपकर्णधार. (Vice Captain Of Team India)

team india
Virat Kohli On WTC Final: WTC कशी जिंकणार? विराटने सांगितला टीम इंडियाचा प्लान

काही दिवसांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर - गावसकर ट्रॉफी पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली.

सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुलने उप कर्णधाराची भूमिका पार पाडली होती. मात्र उर्वरित २ कसोटी सामन्यांमध्ये केएल राहुलचं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं. या २ सामन्यांमध्ये भारतीय संघ उपकर्णधाराशिवाय मैदानात उतरला होता. (Latest sports updates)

team india
WTC Final: टीम इंडियातील 'या' खेळाडूची बॅट तळपली तर ऑस्ट्रेलियाचं काही खरं नाही! इंग्लंडमधील दमदार रेकॉर्ड एकदा पाहाच..

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार रोहित शर्माला संघाचा उपकर्णधार निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात असे लिहिले आहे की, ' संघाचा उपकर्णधार अजूनही निश्चित करण्यात आला नाही.

रोहित शर्माला जर काही कारणास्तव मैदान सोडावं लागलं तर, रोहितला जो खेळाडू योग्य वाटेल त्या खेळाडूकडे जबाबदारी सोपवू शकतो.'

भारतीय संघाचा उपकर्णधार कोण असेल? अशा चर्चा सुरू असताना आर अश्विन आणि चेतेश्वर पुजारा यांचं नाव सुचवलं गेलं होतं.

मात्र याबाबत कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. भारतीय संघात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सारखे काही अनुभवी खेळाडू आहेत. जे ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकतात.

त्यामुळे रोहितला काही कारणास्तव मैदान सोडावं लागलं. तर या दिग्गज खेळाडूंचा विचार केला जाऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com