Rohit Sharma: रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड, व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा देशातील सर्वाधिक पसंतीचा क्रिकेटपटू आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSaam Tv

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा देशातील सर्वाधिक पसंतीचा क्रिकेटपटू आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. १५ ऑगस्टलाही असाच प्रकार समोर आला आहे. राहित शर्मा आपल्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. यावेळी बाहेर असणाऱ्या चाहत्यांना हे कळताच रेस्टॉरंटच्या बाहेर रोहितला पाहण्यासाठी गर्दी झाली.

यावेळी प्रत्येक चाहता रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाला होता. यावेळी रोहित रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, पण, प्रचंड गर्दी पाहून त्याला आपला विचार बदलावा लागला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला परत आत पाठवले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांची एवढी गर्दी पाहून रोहितही (Rohit Sharma) अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे.

Rohit Sharma
७ मॅचमध्ये ठोकली ६ शतके, कुटुंब सोडून प्रशिक्षकाच्या घरी राहिला; आता टीम इंडियात संधी

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय टीमने वेस्ट इंडिजचा पाच T20 सामन्यांच्या मालिकेत पराभव केला. आशिया चषकापूर्वी रोहितही विश्रांतीवर गेला आहे. पण ही विश्रांती त्याच्यासाठी त्रासाची ठरली आहे. मुंबईतील 'द टेबल' रेस्टॉरंटमध्ये तो आपल्या मित्राला भेटायला गेला होता. रोहित शर्मा रेस्टॉरंटमध्ये आला आहे हे काही चाहत्यांना समजताच रेस्टॉरंटबाहेर त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी केली. त्यामुळे रस्त्यावरही ट्राफीक जाम झाले होते.

Rohit Sharma
Ravindra Jadeja Update| रवींद्र जडेजा CSK सोडणार? नेमका काय झाला होता वाद?

टीम इंडियाची होणार फिटनेस टेस्ट

रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ३ वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. १८ ऑगस्टपासून दोन्ही देशांदरम्यान ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आशिया चषकासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे फिटनेस टेस्ट बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होणार आहे. येथे खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यावी लागेल. यानंतर टीम इंडिया दुबईला रवाना होणार आहे. आशिया चषकात भारताला २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com